आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nanded
  • Will Rejuvenate The Youth On The Issues Of Marathwada, Re appointed President Of Marathwada Janata Vikas Parishad Dr. Information Of Venkatesh Kabde

दिव्य मराठी विशेष:मराठवाड्याच्या प्रश्नांवर तरुणाईला करणार जागे, मराठवाडा जनता विकास परिषदेचे फेरनियुक्त अध्यक्ष डॉ. व्यंकटेश काब्देंची माहिती

नांदेड15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्यातील सिंचन, बेरोजगारी, विकास मंडळाची स्थापना, रेल्वेचे प्रश्न सोडवण्यासाठी जनतेत जागृती िनर्माण करणे गरजेचे आहे. जनता, तरुणाई व लोकप्रतिनिधींमध्ये या प्रश्नांची जाण निर्माण करण्याचे मोठे आव्हान आहे. त्यामुळे मराठवाड्यातील प्रत्येक महाविद्यालयात जाऊन मराठवाडा जनता विकास परिषदेचा तरुणांचा गट निर्माण केला जाणार असल्याचे मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी “दिव्य मराठी’ला सांगितले. परिषदेच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मराठवाड्यातील विविध प्रश्नांवर आपले मत नोंदवले.

डॉ. काब्दे म्हणाले की, बहुसंख्य जिल्ह्यांत ७० ते ८० टक्के तरुणांचा सहभाग आहे. त्यामुळे पुढे नेतृत्व तरुणांकडे जाणे आवश्यक आहे. मराठवाडा जनता विकास परिषदेचे काम गोविंदभाई श्रॉफ यांच्या नेतृत्वात १९७५ पासून सुरू झाले. मराठवाड्याच्या प्रश्नांवर अनेक आंदोलने करण्यात आली. १९९९ मध्ये परिषदेची स्थापना झाली. १९७९ पासून संघटनेशी जोडला गेलो आहे. संघटनेला वैधानिक स्वरूप द्यावे, यादृष्टीने मराठवाडा जनता विकास परिषदेचा प्रयत्न सुरू होता. त्यात गोविंदभाई श्रॉफ अग्रभागी होते. १९९४ मध्ये वैधानिक विकास मंडळाची स्थापना झाली. मराठवाडा, विदर्भ व पश्‍चिम महाराष्ट्र यांचा समन्यायी विकास व्हावा, हा उद्देश होता. एक यंत्रणा निर्माण झाली. विकास मंडळाचे प्रमुख हे राज्यपाल असून वेगवेगळ्या समित्या अभ्यास करून राज्यपालांना अहवाल सादर करतात. महाराष्ट्राचे जे काही बजेट आहे ते लोकसंख्येंच्या प्रमाणात वितरण व्हावे, ही तत्वे पाळण्यात आली. पण विकास मंडळाची कालमर्यादा पाच वर्षांची असते. त्याचे नूतनीकरण होणे आवश्यक आहे. अनुशेष समित्यांच्या अहवालावर दुर्दैवाने एक वर्षाचा अपवाद सोडला तर विधिमंडळामध्ये चर्चा झाली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

सिंचन, शिक्षण, रेल्वे अन् रोजगाराच्या प्रश्नांवर उठवला आवाज * जायकवाडीचे पाणी मराठवाड्याला ठरवून दिलेल्या तरतुदीनुसार मिळावे यासाठी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल. * विकास मंडळाची २०२० मध्ये मुदत संपली. त्याला मुदतवाढ मिळण्यासाठी ठिकठिकाणी आंदोलने. * नांदेड-लातूर, नांदेड-बिदर, नगर-परळी-बीड मार्ग, जालना- खामगाव, रोटेगाव-कोपरगाव हे प्रकल्प रखडले आहेत. एकही नवीन मार्ग झाला नाही. * मराठवाडा विभाग मध्य रेल्वेला जोडण्याची मागणी मराठवाडा जनता विकास परिषदेने रेल्वे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली. * मराठवाड्याला मिळालेली आयआयटी ही संस्था नागपूरकडे वळवली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाची मान्यता द्यावी, ही मागणी लावून धरली.

बातम्या आणखी आहेत...