आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेडमधील 30 गावांतही तेलंगणात समाविष्ट करण्याची मागणी:मूलभूत सुविधाही मिळत नसल्याची तक्रार, बुधवारपासून संवाद यात्रा

नांदेड/ नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न तापलेला असतानाच नांदेड जिल्ह्यातील सीमाभागात असलेल्या ३० गावांतही तेलंगणात समाविष्ट करण्याची मागणी करत राजकारण पेटले आहे. देगलूर, बिलोली, धर्माबाद तालुक्यातील जवळपास ३० गावांत मूलभूत सुविधा मिळत नसल्याने तेलंगणात समाविष्ट होण्यासाठी ७ ते १० डिसेंबर या कालावधीत संपर्क संवाद यात्रा काढली जाणार आहे. बुधवारी सकाळी साडेआठ वाजता मौजे हाेट्टल (ता. देगलूर) येथील सिद्धेश्वर मंदिरात नारळ फोडून यात्रा प्रारंभ होईल. यासाठी संपर्क संवाद अभियान समिती स्थापन करण्यात आली आहे. शेतीला २४ तास मोफत वीज, मुलीच्या लग्नासाठी लक्ष्मी कल्याण योजना आदी मागण्या गावकऱ्यांनी केल्या आहेत.

होर्डिंगविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन

विमानतळाबाहेर लावण्यात आलेल्या कर्नाटक सरकारच्या हाेर्डिंगविरुद्ध शिवसेना ठाकरे गटाने आंदोलन करत नाराजी व्यक्त केली.हे होर्डिंग २४ तासांत हटवले नाही तर शिवसैनिक होर्डिंग्ज फाडून टाकतील, असा इशारा शहरप्रमुख नितीन तिवारी यांनी प्रशासनाला दिला.

बातम्या आणखी आहेत...