आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्ज छाननी:चांदवडला सरपंच पदाचा 1 तर सदस्य पदाचे 13 अर्ज अवैध

चांदवड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी अर्ज छाननीत सरपंचपदाचा एक तर सदस्यपदाचे १३ अर्ज अवैध ठरल्याची माहिती तहसीलदार प्रदीप पाटील, निवडणूक शाखेचे दिलीप मोरे यांनी दिली.सरपंचपदासाठी १५५ तर सदस्यपदासाठी ७३७ अर्ज दाखल झाले होते.

अर्ज छाननीत सरपंच पदासाठी साळसाणे- मंगला निवृत्ती ठाकरे यांचा अर्ज अवैध ठरला तर सदस्यपदासाठी देवरगाव- सुर्यभान ताथुबा माळी (वार्ड ४), शिंगवे- सचिन साहेबराव खताळ (वाॅर्ड २), भाटगाव- निखील संजय वैराळ (वाॅर्ड १), साळसाणे- हनुमान पाटीलबा देवरे (वाॅर्ड ३), बोराळे- अलका रामदास गांगुर्डे (वाॅर्ड १), पुरी- सूर्यभान पंढरीनाथ जाधव (वाॅर्ड १), कोकणखेडे- राधाबाई संदिप शिंदे (वाॅर्ड १), मंदा आण्णा शिंदे (वाॅर्ड ३), तळेगावरोही- विशाल रामदास वाकचौरे, दीपक रंभाजी ठाकरे (वाॅर्ड १), सोनीसांगवी- रेखा गोरखनाथ घंगाळे (वाॅर्ड ३), दहेगाव म.- छगन अभिमान मोरे (वाॅर्ड १), गणूर- दशरथ संतू ठाकरे (वाॅर्ड १) असे एकूण १३ अर्ज अवैध ठरले.

चांदवड तालुक्यातील नारायणगाव व दुधखेड येथे सरपंच पदासाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाल्याने तेथील सरपंचपदाची अविरोध निवड निश्चीत मानली जात आहे. तर सदस्यपदासाठी नारायणगाव ७, तळवाडे ६, भाटगाव ४ अशा एकूण १७ जागांवर एकमेव अर्ज वैध ठरले असल्याने या जागांवर अविरोध निवडीची औपचारिकता बाकी आहे.

तळवाडे येथील वाॅर्ड क्र. ३ मधील अनु. जमातीसाठी असलेल्या सदस्यपदाच्या जागेवर एकही अर्ज दाखल न झाल्याने ही जागा पुन्हा रिक्त राहणार आहे. माघारीनंतरच खरे चित्र स्पष्ट होणार असून दि. १८ डिसेंबरला मतदान व दि. २० डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...