आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार सुहास कांदे‎ यांची माहिती‎:मनमाड नगरपरिषदेच्या अद्ययावत‎ इमारतीसाठी 10 कोटी निधी मंजूर‎

मनमाड‎14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण‎ कामासाठी विशेष अनुदान या‎ योजनेंतर्गत मनमाड नगर‎ परिषदेची नवीन प्रशासकीय‎ अद्यावत व सर्व सुविधांयुक्त‎ इमारत बांधण्यासाठी १० कोटी‎ रूपयांचा निधी राज्य शासनाच्या‎ नगरविकास विभागाने एका खास‎ आदेशान्वये गुरुवारी मंजूर केला‎ आहे.‎ नांदगाव विधानसभा मतदार‎ संघाचे शिवसेना आमदार सुहास‎ कांदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे‎ यांच्याकडे यासाठी वारंवार‎ पाठपुरावा केला होता. तसेच‎ विधानसभेत १३ फेब्रुवारीस‎‎‎‎‎‎‎ आपल्या भाषणातून त्यांनी‎ सध्याची नगरपालिकेची इमारत‎ नादुरुस्त असल्याने व अनेक‎ ठिकाणी पडझड झाल्याने नवीन‎ इमारत बांधण्यासाठी १० कोटी‎ रूपयांची मागणी मुख्यमंत्र्याकडे‎ केली होती. ही मागणी‎ मुख्यमंत्र्यांनी मान्य करीत गुरूवारी‎ विधानसभेत मनमाड‎ नगरपरिषदेला वैशिष्ट्यपूर्ण‎ कामासाठी १० कोटींचे अनुदान‎ मंजूर करत असल्याची घोषणा‎ केली आहे.

नवीन नगरपालिका‎ प्रशासकीय इमारतीच्या प्रकल्प‎ खर्चाच्या ९० टक्के हिस्सा हा‎ राज्य शासनाचा व १० टक्के‎ हिस्सा मनमाड नगरपरिषदेचा‎ राहाणार आहे. कार्यान्वयन‎ यंत्रणाही मनमाड नगरपरिषद हीच‎ राहाणार आहे. त्यानुसार‎ लवकरच या कामाची इ-निविदा‎ निघणार आहे. हे काम पूर्ण‎ करण्याची मुदत ३१ मार्च २०२४ ही‎ राहाणार आहे. या वैशिष्टयपूर्ण‎ कामासाठी राज्य शासनाकडून‎ मंजूर करण्यात आलेली ९० टक्के‎ म्हणजे ९ कोटी रूपयांची‎ अनुदानाची रक्कम तत्काळ‎ मनमाड नगरपरिषदेला कोणत्याही‎ प्रकारची कपात न करता वितरीत‎ केली जावी, असे या‎ शासननिर्णयात नमूद करण्यात‎ आले आहे. त्यात नगरपालिकेने‎ १० टक्के म्हणजे एक कोटी‎ रुपयांचा स्वनिधी टाकावयाचा‎ आहे.‎

बातम्या आणखी आहेत...