आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:निफाडचे 10 विद्यार्थी अग्नीवीर ; निफाड महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांचा सत्कार

निफाड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील महाविद्यालयाच्या एनसीसीमध्ये शिक्षण घेतलेल्या १० विद्यार्थ्यांची भारतीय सैन्यदलात अग्निवीर म्हणून निवड झाली या विद्यार्थ्यांचा नुकताच मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांच्या हस्ते निफाड येथे सत्कार करण्यात आला.

शुभम शिंदे, शुभम सईंद्रे यांची आर्टिलरी सेंटर, नाशिक येथे निवड), आकाश इंगळे, चेतन बोरगुडे, आकाश कोटमे, समाधान फटांगरे यांची हैदराबाद येथे निवड, नीलेश महाले (मध्य प्रदेश येथे निवड), किशोर पवार, प्रतीक नीलक यांची वसई येथे निवड, सोपान साप्ते (अहमदनगर येथे निवड) या सर्व नवनियुक्त अग्निवीरांचा त्यांनी सत्कार केला.

याप्रसंगी प्राचार्य डॉ. ए. के. शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हास्तरीय योगा स्पर्धेत नाशिक विभागस्तरावर निवड झालेल्या गायत्री सोनवणे हिचा सत्कार करून कबड्डी स्पर्धेत सुवर्णपदक मिळविलेल्या संघाचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक प्रा. ए. एस. वडघुले यांनी केले. संयोजन आणि सूत्रसंचालन मराठी विभागप्रमुख प्रा. महेश बनकर यांनी केले. प्रा. एस. बी. गायकवाड यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी प्रा. ए. एल. गायकवाड, प्रा. लोकेश गळदगे, डॉ. प्रवीण ढेपले, चेतन कुंदे, प्रा. नीलेश साबळे आदींसह प्राध्यापक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

बातम्या आणखी आहेत...