आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहीम:बेशिस्त चालकांकडून 10 हजारांचा दंड वसूल

लासलगाव11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लासलगाव पोलिस ठाण्याच्या वतीने बेशिस्त वाहनचालकांवर व विना कागदपत्रे दुचाकी फिरवणाऱ्या ३५ वाहनचालकांकडून रविवारी (दि. २०) सुमारे १० हजार रुपयांचा आर्थिक दंड गोळा करण्यात आला. येथून पुढे दररोज अशी कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी दिली.शहरात अनेक वाहनचालक हे नियमांचे पालन करीत नाहीत व तसेच विना कागदपत्रे आपली वाहने चालवतात. याची तपासणी करण्याकरिता लासलगाव पोलिस ठाण्याने विशेष मोहीम राबविली.

शहरातील कोटमगावरोड, विंचूररोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर या ठिकाणी सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ, उपनिरीक्षक आदिनाथ कोठुळे, कॉन्स्टेबल प्रदीप आजगे, वाहतूक पोलिस देवडे, शिंदे यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले होते. दुचाकीवर ट्रीपलशीट बसवून वाहतूक करणे, वाहनाचे कागदपत्रे नसणे, फॅन्सी नंबरप्लेट, वाहनाला नंबरप्लेट नसणे, वाहन चालविण्याचा परवाना नसणे अशा सर्व वाहनचालकांवर कारवाई करणार असल्याची माहिती राहुल वाघ यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...