आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:‘कंचनसुधा’चा 100 टक्के निकाल ; धवल यशाची परंपरा कायम

येवला19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धानोरे येथील कंचनसुधा ज्युनिअर कॉलेजने धवल यशाची परंपरा कायम राखली आहे. वाणिज्य शाखेत कल्पेश जाधव ८८.३३ टक्के मिळून तालुक्यात प्रथम क्रमांकाने व नीलेश गुंजाळ तालुक्यात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. विज्ञान, वाणिज्य आणि कला तिन्ही शाखांचा निकाल १०० टक्के लागला. विज्ञान शाखेत तेजस ठोंबरे ८९.१७ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक आला. प्रमोद वारुळे (८८.५०%) द्वितीय तर सिद्धार्थ पवार (८६.००%) गुण मिळवून तृतीय आला. वाणिज्य शाखेत कल्पेश जाधव ८८.३३ टक्के गुण मिळवून प्रथम आला. नीलेश गुंजाळ (८७.६७ टक्के) द्वितीय तर विशाल पवार, पूनम कोल्हे, अश्विनी गायकवाड तिघेही ७९.१७ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. कला शाखेत निकिता सोनवणे ८२.६७% गुण मिळवून प्रथम आली. भूमिका उबाळे ८०.३३% द्वितीय, सरला बोळिज ७९.३३% गुण मिळवून तृतीय आली. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था, प्राध्यापकांनी कौतुक केले.

बातम्या आणखी आहेत...