आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील महाराष्ट्र शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी हायस्कूल व दिनकरराव पानगव्हाणे कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल ९७.७०% टक्के लागला आहे. या विद्यालयाने याही वर्षी यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
मयुरी मोगल ९२.२०% टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम आली आहे. समृद्धी शिंदे ९१.४०% द्वितीय, सिद्धी मापारी ९१% तृतीय, वैष्णवी माळी ९०.६०% चतुर्थ, दीक्षा कर्डक ८८.८०% पाचवी आली आहे. यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गुलाबराव जोंधळे, कार्यकारी संचालक दीपक जोंधळे, कार्याध्यक्ष/सचिव दत्तात्रय जोंधळे, सरपंच अनिता पानगव्हाणे, उपसरपंच सिंधूताई ढोमसे व नीता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मधुकरराव ढोमसे, उपाध्यक्ष साहेबराव पानगव्हाणे, बाजार समितीचे संचालक भास्करराव पानगव्हाणे, पंचायत समितीचे सदस्य सोमनाथ पानगव्हाणे, प्राचार्य कैलास गवळी यांनी अभिनंदन केले आहे. या विद्यार्थ्यांना नंदराम ढिकले, राजाराम वाबळे, विजयकुमार कोतवाल, सचिन वाबळे, बापू आव्हाड, राहुल दवते, युवराज गायकवाड, रविकिरण जोंधळे, रुक्साना पठाण, शीतल ढोमसे पाटील यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.