आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वतंत्र‎ बसची सुविधा:आयटीआय उत्तीर्ण 102 विद्यार्थ्यांना‎ रोजगारसंधी 12 हजारांचे वेतन‎

नाशिक‎23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मविप्र संस्थेच्या औद्योगिक प्रशिक्षण‎ संस्थे महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीतर्फे‎ आयोजित रोजगार मेळाव्यात‎ आयटीआय उत्तीर्ण झालेल्या १५०‎ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.‎ त्यातील १०२ विद्यार्थ्यांना नोकरीच्या‎ संधी प्राप्त झाल्या असून त्यांना मासिक‎ १२ हजारांचे वेतन व इतर सुविधा‎ उपलब्ध करून दिल्या जाणार आहे.‎ विशेष म्हणजे, मुलींसाठी स्वतंत्र‎ बसची सुविधा सुरू केली जाणार‎ असल्याची माहिती कंपनीच्या एचआर‎ विभागातर्फे देण्यात आली आहे.‎ महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीतर्फे‎ विलास झुझुर्डे व महेश सूर्यवंशी यांनी‎ मेळाव्यात सहभागी झालेल्या‎ जिल्हाभरातून आलेल्या विविध‎ ट्रेडच्या प्रशिक्षणार्थ्यांच्या तोंडी‎ मुलाखती घेतल्या.‎

त्यानंतर १०२ विद्यार्थ्यांची निवड‎ कंपनीतर्फे करण्यात आली असून‎ इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर, मोटार‎ मेकॅनिक व कॉम्प्युटर ऑपरेटर या‎ पदांसाठी निवड करण्यात आली.‎ त्यांना १२ हजारांचे वेतन तसेच‎ कंपनीच्या वतीने त्यांना नाश्ता, बूट व‎ गणवेश देखील पुरविले जातील.‎ मुलींसाठी बसची व्यवस्था केली‎ जाईल, अशी माहिती एचआर मॅनेजर‎ विलास झुंझुर्डे यांनी दिली. निवड‎ झालेल्या विद्यार्थ्यांची वैद्यकीय‎ तपासणीदेखील करण्यात आली.‎ यावेळी आयटीआयचे प्राचार्य संजय‎ बोरस्ते यांच्यासह मविप्र संस्थेचे‎ सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांचे‎ मार्गदर्शन लाभले.‎

बातम्या आणखी आहेत...