आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वनराई:कृषी उपविभागात डिसेंबरअखेर 1040 वनराई बंधारे बांधणार

मालेगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कृषी विभागाच्या मालेगाव उपविभागतील मालेगाव, सटाणा व नांदगाव या तीनही तालुक्यात पाणी उपलब्ध आहे. पावसाळा संपत आल्याने ओढे नाल्यांमधील वाहून जाणारे पाणी लोकसहभागातून वनराई बंधारे बांधून पिकांना सिंचन देण्यासाठी व जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होण्यासाठी १०४० वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट असून शेतकरी, वन्यप्रेमी व तरुणांनी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी दिलीप देवरे यांनी केले आहे.

वनराई बंधारा हा जमीन तळापासून ४ ते ५ फूट व नाल्याच्या रुंदीनुसार १९ ते १५ फूट लांब बांधण्यात येवून त्यासाठी तीन थरांमध्ये ८० ते १०० गोणींची आवश्यकता असते. तसेच वनराई बंधाराऱ्यास बांध केल्यास एक वनराई बंधाऱ्याद्वारे ०.२० हेक्टर क्षेत्र सिंचित होऊ शकते. अशा वनराई बंधाऱ्याच्या माध्यमातून बिगर पावसाळी हंगामातील पाण्याची गरज काही प्रमाणात भागविण्यासाठी सिमेंट व खतांच्या रिकाम्या गोण्या, माती वाळूचा वापर करून पाण्याचा प्रवाह अडविण्यात येतो. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल. चालू वर्षात उपविभागातील मालेगाव तालुक्यात ३८०, सटाणा ३७० व नांदगाव २९० असे १ हजार ४० वनराई बंधारे डिसेंबरअखेर बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

नांदगाव तालुक्यातील मौजे गंगाधरी येथे गावकरी, कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी श्रमदानाने पाच वनराई बंधारे बांधून शुभारंभ केला आहे. त्यानुसार उपविभागातील मालेगाव, सटाणा व नांदगाव तालुक्यातील शेतकरी, बांधकाम व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ यांनी वनराई बंधारे बांधण्यासाठी कृषी विभागाने निश्चित केलेल्या जागी स्वयंस्फूर्तीने रिकाम्या गोण्या उपलब्ध करून बंधारे बांधकाम मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी देवरे व तंत्र अधिकारी गोकुळ अहिरे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...