आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यात दहावीच्या परीक्षेला कडक वातावरणात सुरुवात झाली. मराठीचा पेपर असला तरी सूचनांची अंमलबजावणी काटेकोरपणे करून घेतल्यामुळे तालुक्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. पर्यवेक्षक बदल, परीक्षा केंद्रावर बसवलेले सीसीटीव्ही आणि वर्गनिहाय अल्प चित्रीकरण यामुळे परीक्षा शिस्तीच्या वातावरणात सुरू झाली. तालुक्यात दहावीच्या परीक्षेसाठी १५ केंद्र आहेत. या केंद्रावर २३३ ब्लॉकमध्ये परीक्षा घेण्यात आली. एकूण पाच हजार ६२२ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले आहेत. परीक्षेसाठी एक तास अगोदर विद्यार्थ्यांना केंद्रावर बोलावण्यात आले होते.
विद्यार्थी विद्यार्थिनींची कडक तपासणी करून परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला. परवानगी नसलेल्या वस्तू प्रवेशद्वारातच जमा करून घेण्यात आल्या. शिक्षणाधिकारी मंजुषा साळुंखे यांच्याकडून प्रत्येक अर्धा तासाला १५ केंद्रावरील स्थितीचा आढावा घेण्यात आला. परीक्षेच्या पहिल्या दिवशी फिरते अथवा बैठे तपासणी पथक कोठेही आले नाही. केंद्रात परीक्षेस आलेल्या विद्यार्थ्यांच्या विद्यालयांखेरीज अन्य विद्यालयातील शिक्षक परीक्षक म्हणून नेमण्यात आले होते. त्यामुळे शिस्तीचे पालन झाले. याशिवाय परीक्षा केंद्र परिसर सीसीटीव्हीच्या टप्प्यात होते. प्रत्येक केंद्रावर पोलिस बंदोबस्त देण्यात आला होता.
रनर कडून चित्रीकरण
गटशिक्षणाधिकारी मंजूषा साळुंखे यांनी परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोच करणे, उत्तर पत्रिका ताब्यात घेणे यासाठी १५ रनरची नेमणूक केली आहे. याच रनरला केंद्रावर विद्यार्थ्यां समोर प्रश्नपत्रिका उघडताना व प्रत्येक वर्गातील परीक्षा वातावरणाचे चित्रीकरण करण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे तालुक्यातील सर्व २३३ ब्लॉक मधील अल्पकाळाचे चित्रीकरण रनर द्वारे करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.