आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थकबाकी:जिल्हा बँकेची सुरगाणा तालुक्यात 12 कोटी 26 लाखांची थकबाकी

बोरगाव25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची नोटाबंदीनंतरची अवस्था बिकट झाली आहे. यामुळे जिल्हा बँकेने थकबाकी वसुलीसाठी अनेक प्रयत्न केले. यानंतर सुरगाणा तालुक्यातील चार शाखांमधून वितरित करण्यात आलेल्या कर्जाची थकबाकी १२ कोटी २६ लाख रुपये आहे. याचबराेबर तालुक्यात कर्जरुपात वितरित करण्यात आलेल्या ९२ ट्रॅक्टरपैकी फक्त १९ ट्रॅक्टर जप्त करण्यात आले असून त्याचा लिलाव करण्यात आला आहे.

नाेटाबंदीच्या अगाेदर जिल्हा परिषदेकडील सर्व विभागांतील कर्मचाऱ्यांच्या पगाराची खाती जिल्हा बँकेत हाेती. याचबराेबर सोसायटी, वीज भरणा, इतर खातेदार, निराधार योजनांसाठी बँक सदैव गजबजलेली असायची. मात्र, नोटाबंदीनंतर आणि कर्ज थकबाकीमुळे परिस्थिती बदलली. सद्यस्थितीत कर्ज वसुलीचे काम सुरू आहे. दिवसागणिक थकबाकीची रक्कम वाढत गेल्याने कर्मचारी व अधिकाऱ्यांंसमाेर वसुलीचे मोठे आव्हान उभे आहे. सद्य:स्थितीत २३ कर्मचारी कार्यरत असून कर्जवाटप केलेल्या सभासदांच्या दारी जात कर्जभरणा करण्याचे आवाहन केले जात आहे.

तालुक्यातील सुरगाणा, उंबरठाण, बोरगाव व बाऱ्हे या चार शाखांमधून २०२२-२३ या वर्षात ४४८ सभासदांना १६६ कोटी ६० लाखांचे थेट कर्ज वाटप करण्यात आले. दुसरीकडे ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंतची जुनी थकबाकी १२ कोटी २६ लाख रुपये आहे. यात ९२ ट्रॅक्टर असून पूर्ण थकबाकीत आहेत. १९ ट्रॅक्टर जप्त करण्यात आले होते. ते सर्व लिलावातून विक्री करण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...