आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाऊस:मनमाड परिसरात 12 विजेचे खांब वाकले; दोन तासांत 67 मिलिमीटर पाऊस

मनमाड25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहर आणि परिसरामध्ये मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी बुधवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या तडाखेबंद पावसामुळे शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शहराचा वीजपुरवठा तब्बल चोवीस तासांपासून खंडित झाला आहे. त्यामुळे बँका, पतसंस्था आणि शासकीय कार्यालयांचे कामकाज ठप्प झाले हाेते.

दरम्यान, बुधवारी शहर आणि परिसरात तब्बल दोन तासात ६७ मिलिमीटर पाऊस झाला. या पावसामुळे मनमाड-नांदगाव व मनमाड-चांदवडरोडवर आठ ठिकाणी कांदाचाळीचे शेड कोसळले. त्यात २४ लाख रुपयांचे नुकसान झाले. सुमारे १३ ठिकाणची झाडे उन्मळून पडली १० ते १२ ठिकाणचे विजेचे पोल वाकले. भारतीय अन्न महामंडळाच्या १२२ गोदामांपैकी सुमारे ८ ते १० गोदामांवरील २२ पत्रे उडाल्याने पावसाचे पाणी आत शिरले.

त्यामुळे काही ठिकाणी थप्पी लावलेली गव्हाची पोती भिजल्याने मोठे नुकसान झाले. ग्रामीण भागात वाऱ्याचा जोर प्रचंड होता. त्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडली व सुमारे २०-२२ घरे पडली, त्यांची छप्परे उडाली. काही शाळांची ही छप्परे उडाली. अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...