आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:120 सहाय्यक उपनिरीक्षकांना बढती

मालेगाव25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सहाय्यक पाेलिस उपनिरीक्षक संवर्गात माेडणाऱ्या नाशिक ग्रामीण पाेलिस दलातील १२० जणांना फाैजदारपदी बढती मिळाली आहे. यात मालेगाव विभागाच्या २८ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यासंदर्भात पाेलिस अधीक्षक कार्यालयातून ३० ऑगस्ट राेजी कर्मचाऱ्यांच्या नावांची यादी जाहीर झाली आहे. बढतीच्या सुखद वार्तामुळे संबंधित कर्मचारी व त्यांच्या कुटूंबियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गुरुवारी पाेलिस नियंत्रण कक्षात बढती मिळालेल्या कर्मचाऱ्यांचे पेढे भरवून सहकाऱ्यांनी अभिनंदन केले.

शासननिर्णयानुसार २५ फेब्रुवारी २०२२ पासून पाेलिस नाईक हा संवर्ग रद्द करुन हे पदे पाेलिस शिपाई, हवालदार व सहायक उपनिरीक्षक या संवर्गामध्ये समाविष्ट करण्यास मान्यता मिळाली आहे. पाेलिस दलात ३० वर्षे सेवा पूर्ण केलेले, सहायक उपनिरीक्षक पदावर किमान तीन वर्षे सेवा पूर्ण असलेल्या १२० कर्मचाऱ्यांना उपनिरीक्षक संबाेधण्याची कार्यवाही आदेशित झाली आहे. त्यानुसार या संवर्गातील सर्वांचा उपनिरीक्षक श्रेणीत समाविष्ट करण्यात आला आहे. या श्रेणीनुसार संबंधितांना उपनिरीक्षक म्हणून संबाेधले जाणार आहे.

कर्मचाऱ्यांच्या वेतनात कुठलाही बदल नाही : बढती मिळालेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कुठलाही बदल हाेणार नाही. पाेलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्यांना पाेलिस उपनिरीक्षक संबाेधून त्याची नाेंद स्टेशन डायरीत करून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश पाेलिस अधीक्षकांनी दिले आहे. या कर्मचाऱ्यांचे पेढे भरवून सहकाऱ्यांनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...