आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:125 कुटुंबांना अन्नधान्य,साहित्य भेट

सिन्नर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर शहरात गुरुवारी (दि. १) झालेल्या ढगफुटीमुळे अनेकांचे संसार उद‌्ध्वस्त झाले असून त्यांना रोजच्या जेवणाची भ्रांत पडली आहे. अशा अडचणीत सापडलेल्या १२५ कुटुंबांना दैनंदिन लागणारे अन्न आणि प्राथमिक गरजेच्या वस्तू मदत स्वरूपात भेट देऊन रोटरी क्लब ऑफ सिन्नरने सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला.ढगफुटी सदृश्य पावसाने सिन्नरच्या सरस्वती नदीला ५३ वर्षांचे रेकॉर्ड मोडणारा पूर आला. यात नदीकाठी असलेल्या शेकडो घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

काहींची घरे आणि संसारही वाहून गेला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. विस्कळीत जीवन पूर्ववत होण्यास काही कालावधी जाईलच, मात्र तोपर्यंत या कुटुंबांना मदतीची गरज आहे. ही बाब ओळखून रोटरी क्लब ऑफ सिन्नर सिटी व नाशिक वेस मित्रमंडळ यांनी एकत्र येत देवी मंदिर ते नाशिक वेस परिसरातील पूरग्रस्तांना मदतीचा हात दिल्याचे रोटरी क्लबचे अध्यक्ष निशांत माहेश्वरी यांनी सांगितले. रोटरी क्लबचे सदस्य राहुल भावसार यांनी सिन्नरकरांना मदतीचे आवाहन केले आहे.‌ यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष निशांत माहेश्वरी, सचिव सुनील ढाणे, कैलास क्षत्रीय, राहुल भावसार, वैभव मुत्रक, उदय गायकवाड, अजय बाहेती, पुष्पराज पेखळे,‌ अतुल बोराडे, रोहित वाघ आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...