आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराग्रामपंचायतीच्या १७ जागेसाठी एकूण १२३ अर्ज दाखल करण्यात आले आहे. तर सरपंचपदासाठी १२ अर्ज दाखल झाले आहे.यामध्ये आमदार दिलीप बनकर गटाकडून सरपंचपदासाठी २ तर सदस्य पदासाठी ५० अर्ज, भास्करराव बनकर गटाकडून सरपंच पदासाठी ३ तर सदस्य पदासाठी ३७ अर्ज, सुजित मोरे गटाकडून सरपंच पदासाठी ५ तर सदस्यपदासाठी ३५ अर्ज, संतोष अहिरराव यांच्याकडून सरपंचपदासाठी १ तर गटातील सदस्यांचे अर्ज तर अपक्ष उमेदवारांनी सुद्धा आपले अर्ज दाखल केले असल्याने दि. ५ रोजी अर्ज छाननी असून यात किती उमेदवारांचे अर्ज बाद होता हे अधिकृत होईल तर दि. ७ रोजी दुपारी ३ पर्यंत अर्ज माघार घेण्याची मुदत तर दुपारी ३ नंतर निवडणुकीच्या उमेदवारांच्या यादीचे अंतिम चित्र स्पष्ट झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या निवडणुकीला रंग चढणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.