आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:आमदार कोकाटे गटाच्या16 तर माजी आमदार वाजे गटाच्या 4 अशा 20 हरकती फेटाळल्या; सिन्नर पालिकेची प्रारूप प्रभागरचनाच झाली अंतिम

सिन्नर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्याधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने तयार केलेली प्रारूप प्रभागरचनाच निवडणूक आयोगाने अंतिम केली आहे. त्यामुळे प्रभाग रचनेवर हरकती घेणाऱ्यांचा हिरमोड झाला असून ही प्रभागरचना काही राजकीय इच्छुकांसाठी सोयीची तर काहींसाठी गैरसोयीची झाली आहे. नवीन प्रभाग रचनेनुसार शहरात आता २ नगरसेवकांचा एक प्रभाग याप्रमाणे १५ प्रभाग तयार करण्यात आले आहे. त्यानुसार आता ३० नगरसेवक निवडून जाणार आहेत. सत्ता सोपान ताब्यात घेण्यासाठी बहुमताचा १६ हा जादुई आकडा राजकीय पक्षांना गाठावा लागणार आहे.

नगरपालिकेची प्रभाग रचना आमदार माणिकराव कोकाटे गटाच्या सोयीची असल्याची चर्चा शहरात राजकीय वर्तुळात झडत आहे. माजी आमदार राजाभाऊ वाजे गटात प्रभाग रचनेविषयी नाराजी आहे. वाजे यांनी विशिष्ट व्यक्तींच्या राजकीय फायद्यासाठी ही प्रभाग रचना बनवण्यात आल्याचा आरोप करत हरकत घेतली आहे. दुसरीकडे वाजे गटाच्या केवळ ४ हरकती असून प्रभाग रचना फायद्याची असतानाही कोकाटे गटाकडून तब्बल १६ हरकती या प्रभाग रचनेवर करण्यात आल्या आहे.

यांच्या हरकती निकाली
प्रभाग ९ वरती दत्तात्रेय हांडे आणि इतर ४, कृष्णानंद कासार, प्रभाग ६ वर दर्शन कासट, प्रशांत सोनवणे, प्रभाग ८ वर हर्षद देशमुख, राकेश कमानकर, अजित पहिलवान, प्रभाग १ वर गणेश खर्जे व इतर ४१, प्रभाग ३ वर सोनाली गवळी, प्रभाग १० वर प्रदीप साळुंखे, शरद गोळे, प्रभाग १२ वर शैलेश नाईक, प्रभाग ४ वर हेमंत वाजे, प्रभाग ५ वर दशरथ कुरणे तर संपूर्ण प्रभाग रचनेवर किरण मुत्रक आणि राजाभाऊ वाजे यांनी हरकत घेतली होती. या सर्व हरकती फेटाळत निवडणूक आयोगाने प्रारूप प्रभाग रचनाच अंतिम केल्याने हरकती घेणाऱ्यांचा हिरमोड झाला.

प्रभागांची व्याप्ती
प्रभाग १ : भैरवनाथ सोसायटी, मापारवाडी, खर्जेमळा, तळवाडी.
प्रभाग २ : कानडी मळा, विजयनगर, विद्यावर्धिनीनगर.
प्रभाग ३ : उज्ज्वलनगर, गणेशनगर, शंकरनगर, मुक्तेश्वरनगर.
प्रभाग ४ : आंबेडकरनगर व सभोवतालचा परिसर.
प्रभाग ५ : परीट गल्ली, सुतार गल्ली, फुले शाळा.
प्रभाग ६ : नगरपरिषद, तानाजी चौक. न. प. नाट्यगृह.
प्रभाग ७ : जोशीवाडी, माकडवाडी, गोंदेश्वर मंदिर, पंचायत समिती कार्यालय.
प्रभाग ८ : गंगा वेस, लाल चौक.
प्रभाग ९ : साईदत्तनगर, देवीरोड.
प्रभाग १० : उद्योग भवन, देशमुखनगर.
प्रभाग ११ : जीएमडी कॉलेज, लक्ष्मीनारायण लॉन्स.
प्रभाग १२ : मधुर मिठास, रामनगरी, हॉटेल पंचवटी.
प्रभाग १३ : वरंदळ मळा, लोहारकर हॉस्पिटल, नवजीवन शाळा.
प्रभाग १४ : पवार शाळा, ऋतुरंग पार्क.
प्रभाग १५ : संगमनेर नाका, डुबेर नाका, परमसाई हॉस्पिटल.

बातम्या आणखी आहेत...