आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:मनमाडला 18 किलो प्लास्टिक जप्त; दुकानदारांना आठ हजार रुपयांचा दंड

मनमाडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्लास्टिक बंदी असतानाही त्याचा सर्रासपणे वापर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मनमाड नगरपालिकेच्या पथकाने गुरुवारी धडक कारवाई केली. विविध दुकानांची तपासणी करून शासनाने प्रतिबंधित केलेले १८ किलो सिंगल युज प्लास्टिक जप्त केले. संबंधित दुकानदारांना ८ हजार रुपयांचा दंड ठोठावला.मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. सचिनकुमार पटेल यांच्या मार्गदर्शनानुसार या कारवाईत नगरपालिकेचे कर अधीक्षक राजेंद्र पाटील, शरद बोडखे, स्वच्छता निरीक्षक विजय सोनवणे, वसुली विभागाचे उमेश सोनवणे, चंद्रकांत झाल्टे, पृथ्वीराज कोळगे, अशोक कटारे, कैलास पाटील, संजय जगताप, प्रमोद सांगळे, रमेश बोरसे, शैलेंद्र आहिरे, अंबादास बनसोडे, आरोग्य विभागाचे दिलीप थोरे, सतीश चावरिया, राजेंद्र धिंगाण, मटरू चुनियान, संतोष वानखेडे आदींचे पथक सहभागी झाले होते.

शासनाच्या आदेशाने सिंगल यूज प्लास्टिक बंदी आहे. असे असतांनाही प्लास्टिकचा सर्रास वापर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या पथकाने भाजी मार्केट, नेहरू रोड, सरदार पटेल रोडवरील, होलसेल किरकोळ दुकानांमध्ये तपासणी करून १८ किलो प्लास्टिक जप्त केले. यामध्ये कॅरिबॅग, प्लास्टिकचे ग्लास, थर्माकॉलच्या पत्रावळ्या, सिल्व्हर कोटेड पत्रावळी यांचा समावेश आहे. प्लास्टिक कॅरिबॅग विक्री करणाऱ्यांवर या पथकाने ८ हजार रुपयांचा दंड ठोठावला.१ जुलै २०२२ पासून सिंगल युज प्लास्टिक बंदी लागू केली आहे. याबाबत वेळोवेळी सूचना देऊनही प्लास्टिकचा वापर सर्रास होत असल्याचे निदर्शनास असल्यामुळे नगरपालिका प्रशासनाने कडक कारवाईचा बडगा उचलला आहे.

प्लॅस्टिक बंदीची शहरांत प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश शासनाकडून प्राप्त झाले आहेत. त्यानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे नगरपालिका प्रशासन कारवाई करत आहे. नागरिकांनी प्लास्टिकचा वापर टाळल्यास मनमाड शहर लवकरच प्लास्टिकमुक्त होईल, असा विश्‍वास मुख्याधिकारी डॉ. सचिनकुमार पटेल यांनी व्यक्त केला.तसेच सिंगल युज प्लास्टिक बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांविरूध्द कडक पावले उचलली जातील, असा इशाराही डॉ. पटेल यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...