आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:गिरणा व मोसम नदी सुधारसाठी 180 कोटी मंजूर; मालेगावसाठी 400 कोटींचे प्रकल्प मंजूर, खासदार डॉ. सुभाष भामरे यांची माहिती

मालेगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र शासनाने गिरणा व मोसम नदी सुधारसाठी १८० कोटी रुपये मंजूर केले आहेत. राज्यातील ११ नद्यांचा या योजनेत समावेश असून यात मालेगावच्या दोन नद्यांचा समावेश आहे. केंद्राने मालेगावच्या विविध प्रकल्पांसाठी ४०० कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिली.

सटाणा नाका भागात भाजप गटनेते सुनील गायकवाड यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. प्रारंभी अद्वय हिरे यांनी निवेदन केले. यात त्यांनी विरोधकांचे नाव न घेता टीका केली. तालुक्याच्या वतीने खासदार डॉ.भामरे यांच्याकडे मागण्या केल्या. त्यांनी वर्षभरात भाजप पक्ष व केंद्राच्या माध्यमातून कामे मंजूर करून घेतली. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मालेगाव बायपाससाठी पाठपुरवा सुरू होता, त्याला यश मिळवून २७५ कोटी रुपये पाटणे फाटा ते दसाने बायपास रस्त्यासाठी मंजूर केले आहेत. चाळीसगाव फाटा चौफुली उड्डाणपूल पुलासाठी ४० कोटी रुपये निधी मंजूर केला आहे.

राष्ट्रीय आरोग्य योजनेच्या माध्यमातून ३४ कोटी रुपये माता बाल संगोपन केंद्रसाठी, अमृत योजनेतून ६० कोटी रुपये भूमिगत गटारसाठी मंजूर आहेत. केंद्र शासनाकडे शेती सिंचनासाठी निधी करता पाठपुरावा केला आहे, त्यामुळे सिंचनाचा ९० टक्के प्रश्न सोडवला आहे. सुरवाडे डॅमचे काम पूर्ण झाल्यावर हे पाणी पुढे दहिकुटे तलावात टाकता येईल, हे काम सुरू आहे. नद्या सुधार योजनेंतर्गत गिरणा व मोसमचे काम ३६ महिन्याचा कालावधीत काम पूर्ण करण्याचे आदेश आहेत.

त्यासाठी डिपीआर तयार होत आहे. नारपार योजना जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असून या प्रकल्पाचे सर्वेक्षण केंद्राला सादर केला आहे. जलसंधारणमंत्री शेखावत यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. त्यांचा डीपीआर दोन वर्षात पूर्ण होईल, यानंतर कामाला १५ हजार कोटी पर्यंत पैसे मिळू शकतील, असा दावाही डॉ.भामरे यांनी केला आहे. पेयजल जलजीवन मिशन अंतर्गत ५७ गावांना मंजुरी मिळाली आहे, यासाठी ३४ कोटी रुपये मंजूर केले आहेत. प्रत्येक घरापर्यंत नळाने पाणी जाईल, यासाठी हे अभियान आहे. मनमाड-इंदुर रेल्वेचा सिलान्यास झाला आहे. कोविडमुळे हे काम बंद होते, ते आता सुरू झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात धुळे ते मालेगाव रेल्वे मार्गाचे काम असल्याचे खासदार डॉ.भामरे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...