आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:राष्ट्रीय लोकन्यायालयात 1826 प्रकरणे निकाली; चांदवडला दोन कोटी 47 लाख 60 हजार 113 रुपयांची वसुली

चांदवड10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुका विधिसेवा समिती व तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. ७) येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयात न्यायचौकशीपूर्व व न्यायालयीन प्रलंबित अशी एकूण १८२६ प्रकरणे निकाली काढण्यात आली तर एकूण दोन कोटी ४७ लाख ६० हजार ११३ रुपये इतकी वसुली करण्यात आली.

राष्ट्रीय लोकन्यायालयात दिवाणी व फौजदारी स्वरूपाची एकूण ६५१ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी २६ प्रकरणांमध्ये तडजोड झाल्याने ती निकाली काढण्यात आली. या लोकन्यायालयात दंडरूपाने व बँक वसुली ३४ लाख १२ हजार ८९१ इतकी रक्कम वसूल करण्यात आली. तसेच ५२०३ प्रीलिटिगेशन प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यातील १८०१ प्रकरणे निकाली काढण्यात आली. ग्रामपंचायतीच्या १६७६, चांदवड नगरपरिषदेच्या ४०, एमएसइबीच्या ३, बँका आणि पतसंस्था यांच्या ८२ तडजोडीच्या निकाली प्रकरणांमध्ये एकूण दोन कोटी १३ लाख ४७ हजार २२२ रुपये इतकी रक्कम वसूल करण्यात आली.

न्यायचौकशीपूर्व आणि न्यायालयीन प्रलंबित प्रकरणांमध्ये एकूण दोन कोटी ४७ लाख ६० हजार ११३ रुपये इतकी वसुली होऊन १८२६ प्रकरणे निकाली काढण्यात आली. राष्ट्रीय लोकन्यायालयात दोन पॅनल ठेवण्यात आले. पॅनल नं. १ मध्ये दिवाणी न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष निनाद इंगळे, पॅनल नं. २ मध्ये सहदिवाणी न्यायाधीश सुनील वाळके यांनी काम पाहिले. पॅनल मेंबर म्हणून अ‍ॅड. एस. एन. पानसरे व अ‍ॅड. एस. व्ही. घुले या विधिज्ञांनी काम पाहिले.

लोकन्यायालयासाठी तालुका वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. दिनकर ठाकरे, उपाध्यक्ष अ‍ॅड. भैयासाहेब पटेल, ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. के. एल. पाटणी, अ‍ॅड. एस. डी. जाधव, अॅड. एस. एम. सोनवणे, अ‍ॅड. व्ही. ए. घुले, अ‍ॅड. राजेंद्र जाधव, अ‍ॅड. सुरेश शेळके, अ‍ॅड. एस. बी. गुंजाळ, अ‍ॅड. पी. पी. जाधव, अ‍ॅड. विशाल व्यवहारे, अ‍ॅड. सचिन कुलकर्णी, अ‍ॅड. पी. के. पाटील, अ‍ॅड. डी. एस. वाळुंज, अ‍ॅड. जी. व्ही. ठाकरे, अ‍ॅड. एस. टी. वाळुंज, अ‍ॅड. एस. पी. बोरसे, गटविकास अधिकारी महेश पाटील, सहायक गटविकास अधिकारी सुनील पाटील, सरकारी अभियोक्ता जगदीश पाटील, एस. व्ही. सुरवाडे, वडनेरभैरवचे पोलिस उपनिरीक्षक डी. एम. गवारे आदींसह वकील संघाचे सदस्य, महावितरणचे कर्मचारी व पक्षकार उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...