आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनेक लाभार्थी भावूक:199 दिव्यांग जगू शकतील सामान्य जीवन; मिळणार कृत्रिम हात, पाय

सिन्नर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अपघात, गँगरीन आदी कारणांमुळे हात व पाय गमावलेल्या १९९ दिव्यांगांना आता सर्वसामान्य जीवन जगता येणार आहे. त्यांना जयपूर फुटवेअरच्या माध्यमातून कृत्रिम हात व पाय मोफत उपलब्ध होणार आहेत. सिन्नर तालुका जनसेवा मंडळ व पुणे येथील साधू वासवानी मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या शिबिरात लाभार्थींच्या हात व पायाचे मोजमाप घेण्यात आले. दीड महिन्यात ते उपलब्ध होणार असून सर्वसामान्यांप्रमाणे चालता-फिरता येणार असल्यामुळे अनेक लाभार्थी भावूक झाले.

ज्येष्ठ नेते प्रकाशभाऊ वाजे यांच्या वाढदिवसानिमित्त शिबिर घेण्यात आले. मिशनचे डॉ. सतीश ढगे, प्रकल्पप्रमुख मिलिंद जाधव, सलील जैन यांनी लाभार्थींना मार्गदर्शन केले. माजी आमदार राजाभाऊ वाजे व डॉ. अशोक सोनवणे यांच्या हस्ते शिबिरास सुरुवात करण्यात आली.

डॉ. ज्योती मोरे, डॉ. दिलीप गुरुळे, डॉ. संजय चव्हाणके, डॉ. सोपान दिघे, डॉ. सागर सदगीर, डॉ. अमोल मोरे, उदय सांगळे, किरण डगळे, नीलेश केदार, दीपक खुळे, विजय जाधव, मनोज भगत, डॉ. रवींद्र पवार, पंकज मोरे, सुनील चकोर, सोमनाथ पावसे, संदीप ठोक, अनिल कवडे, संतोष खर्डे, शिरीष ठाणेकर, पिराजी पवार, राजेंद्र घोरपडे, देवीदास वाजे, रावसाहेब आढाव, प्रशांत रायते, संजय सानप, अनिल सरवार, लक्ष्मण बर्गे, परेश पाटील आदी उपस्थित होते. सिन्नरसह चांदवड, सटाणा, कळवण, मनमाड, दिंडोरी, इगतपुरी, बीड, नंदुरबार, गेवराई, बुलडाणा, धुळे, राहुरी, शिर्डी, नगर येथील १९९ लाभार्थींना लाभ मिळेल.

१६ वर्षांत २६ हजार दिव्यांगांना लाभ
२००७ पासून मिशनने शिबिराद्वारे २६ हजार दिव्यांगांना लाभ दिला आहे. महाराष्ट्राच्या बाहेरही ही सेवा देण्यात आली आहे. १० वर्षापूर्वी जनसेवा मंडळाने घेतलेल्या शिबिरात १६९ दिव्यांगांना लाभ दिला होता. पुन्हा मोफत सेवा देताना समाधान वाटत असल्याचे डॉ. ढगे यांनी सांगितले.

सायकल, रिक्षा चालवू शकतील
दीड महिन्यात लाभार्थींना कृत्रिम हात-पाय वितरण करण्यात येणार असल्याचे माजी आमदार वाजे यांनी सांगितले. दुर्घटनेत हात-पाय गमावणारे, मधुमेहाने त्रस्त, रक्तवाहिनींच्या विकाराने आणि गँगरीन झालेले सर्वसामान्य जीवन जगण्यास समर्थ असतील. चालणे, फिरणे, एवढेच नव्हे तर सायकल, रिक्षा चालवणे शक्य होईल. पळता, खेळताही येणार आहे. सामान्य जीवन जगण्याची उमेद मिळणार असल्याने पीडितांचे समाधान हेच मंडळाच्या कामाचे चीज असल्याचे वाजे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...