आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हल्ला:पुरी परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात 2 वासरे व कुत्रा ठार; शेतकऱ्यांत भीती

चांदवडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील पुरी व खेलदरी शिवारात बिबट्याने दोन वासरे व एका कुत्र्यावर हल्ला करून त्यांचा फडशा पाडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.चांदवड तालुक्यातील पुरी येथील परशराम केदू जाधव या शेतकऱ्याच्या दोन वासरांवर मंगळवारी (दि. १) मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून त्यांना ठार केले.

तर बुधवारी (दि. २) रात्री खेलदरी येथील दानिश भैय्यासाहेब पटेल या शेतकऱ्याच्या दोन पैकी एका कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून ठार केले. या भागात बिबट्याचा संचार असल्याने वन विभागाने परिसरात पिंजरा लावावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...