आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोमॅटोची आवक:पिंपळगावला टोमॅटोची २ लाख क्रेट आवक, 611 रुपये क्रेट भाव

राकेश बनकर | पिंपळगाव बसवंत8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अतिवृष्टीमुळे बंगळुरूत टाेमॅटाे खराब हाेत असून उत्पादनातही माेठी घट हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिकच्या टाेमॅटाेला अधिकची मागणी येऊ लागली आहे. पिंपळगाव बाजार समितीत टाेमॅटाे खरेदी करण्यासाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या वाढली आहे. परिणामी बाजार समितीत टाेमॅटाेची प्रचंड आवक हाेत असली तरीही भावात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

मंगळकोथिंबिरीला शेकडा १६,००० भाव नाशिक| नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी कोथिंबिरीला शेकडा सोळा हजार रुपये भाव मिळाला. गुरुवारी सायंकाळी दिंडोरी तालुक्यातील कोऱ्हाटे येथील शेतकरी सोमनाथ शिवाजी भवर यांनी आणलेल्या कोथिंबीरला शेकडा सोळा हजार रुपये भाव मिळाला. ही कोथिंबीर संतोष भुजबळ या व्यापाऱ्याने खरेदी केली.वारी बाजार समितीत दाेन लाख क्रेट आवक हाेऊनही २० किलाेच्या क्रेटला ६११ रुपये भाव मिळाला तर सरासरी भाव ४३१ रुपयांपर्यंत मिळाला.

पिंपळगाव बाजार समितीत १० जुलै रोजी टोमॅटो लिलाव सुरू करण्यात आल्यानंतर प्रारंभी आवक व व्यापारीवर्गाची संख्या कमी असल्याने सरासरी २८० रुपये प्रति क्रेट दर होता. मात्र, दोन महिन्यांनंतर बंगळुरू येथील टोमॅटो पावसामुळे खराब होत असल्याने तसेच इतर तालुक्यांतील शेतकरी टोमॅटो घेऊन बाजार समितीत विक्रीसाठी येत असल्याने आवकेबराेबरच दरातही वाढ हाेत आहे. गत आठवड्यात जास्त पावसामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले या पावसामुळे झाडाला आलेली फळे गळून पडली तर काही सडून गेली. मात्र, या आठवड्यात पाऊस थांबल्याने आवकेत व दरातही वाढ झाली आहे.