आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधी:लासलगाव, विंचूरसह सोळागाव पाणी योजनेस २० कोटींचा निधी ; लवकरच निविदा प्रक्रिया

लासलगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत लासलगाव-विंचूरसह सोळा गाव पाणीपुरवठा योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. त्यानुसार या योजनेसाठी एकूण २० कोटी १० लाखांचा निधीस शासनाने मंजुरी दिली आहे.या योजनेला जलजीवन मिशन कार्यक्रमामध्ये रेट्रोफिटिंग अंतर्गत नूतनीकरणाच्या प्रस्तावास पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून जानेवारी २०२२ मध्ये मंजुरी मिळाली आहे. या योजनेसाठी १७ कोटी ५४ लाख रुपयांचा निधीदेखील शासनाकडून मंजूर झालेला होता.

मात्र, दर सूचित वाढ झाल्याने या योजनेसाठी अधिकच्या निधीची गरज होती. त्यानुसार या योजनेसाठी आता एकूण २० कोटी १० लाख रुपयांच्या प्रस्तावास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येऊन योजनेच्या दुरुस्तीच्या कामास सुरुवात होणार आहे. प्रस्तावात सौरऊर्जा प्रकल्पाचादेखील समावेश असल्याने योजनेच्या वीजबिलाचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे.

या योजनेमध्ये लासलगाव, विंचूर, विठ्ठलवाडी, सुभाषनगर, विष्णूनगर, डोंगरगाव, नांदगाव, कोटमगाव, टाकळी विंचूर, बोकडदरा, धारणगाव खडक, धारणगाव वीर, ब्राह्मणगाव विंचूर, पिंपळगाव नजीक, निमगाव वाकडा, हनुमाननगर या सोळा गावांचा समावेश असून योजनेच्या नूतनीकरणामुळे येथील गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...