आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योजना:निराधार योजनेसाठी २१ हजारांची उत्पन्न मर्यादा ठरतेय अडसर; उत्पन्न मर्यादा वाढवण्याची कोतवाल यांची मागणी

सिन्नरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा शासनाकडून अनुदान दिले जाते. परंतु या योजनेत समाविष्ट होण्यासाठी राज्य शासनाने ठरवून दिलेली वार्षिक २१ हजार रुपयांची उत्पन्नाची अट ही अडसर ठरत आहे. एवढ्या कमी रकमेचा दाखला तलाठ्यांकडून दिला जात नसल्याने या योजनेचा लाभ गरजूंना मिळत नसल्याचे समोर आले आहे.

त्यामुळे या योजनेसाठी उत्पन्न मर्यादेची अट शिथिल करावी. किंवा २१ हजारांपेक्षा अधिक उत्पन्नाचा‌ दाखला ग्राह्य‌ धरावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष नामदेव कोतवाल यांनी केली आहे. संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ वृद्धापकाळ वेतन योजनेमध्ये निराधारांना मासिक अनुदान दिले जाते. तथापि, यामध्ये पात्र लाभार्थी निवडण्याची प्रक्रिया गेल्या अनेक वर्ष थांबलेली आहे.

याकडे कोतवाल यांनी लक्ष वेधले आहे. २१ हजारांपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न असल्याने येथील तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार विभागात अनेक प्रस्ताव नामंजूर होत आहेत. लाभार्थी या योजनेत पात्र असूनही शासनाच्या जाचक अटीमुळे ‘अपात्र’ ठरत आहेत.

वर्षानुवर्षे असलेल्या शासनाच्या लाभाच्या असलेल्या निराधार योजनेसाठी दारिद्र्यरेषेखालील अन्नसुरक्षा योजनेत व अंत्योदय योजनेत अन्नधान्य मिळविण्यासाठी असलेले वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ही वाढत्या महागाईमुळे कालबाह्य झाली आहे. त्यामुळे वंचित व दारिद्र्यरेषेखालील घटकाला शासनाच्या असलेल्या सुविधांचा लाभ मिळण्यासाठी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा वाढविण्याची गरज आहे.

बातम्या आणखी आहेत...