आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशासकीय धान्य लाभापासून वंचित २२ हजार ५८८ व्यक्तींना नियमित धान्य वाटप करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. शहरातील केशरी कार्डधारकांच्या वाटपासाठी विशेष धान्य मागणीचा प्रस्ताव अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अवर सचिवांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पाठविण्यात आला आहे. सध्या किमान २५ टक्के जनतेला धान्य मिळण्याचा मार्ग माेकळा झाल्याने २६ डिसेंबरचे घेराव आंदाेलन स्थगित केल्याची माहिती माजी आमदार आसिफ शेख यांनी दिली.
शनिवारी राष्ट्रवादीच्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत शेख यांनी मंजुरी पत्र दाखवून आंदाेलनाला यश आल्याचे स्पष्ट केले. एक लाख १९ हजार केशरी कार्डधारक शासकीय धान्याच्या लाभापासून वंचित आहेत. यातील बहुतांश कार्डधारकांचे वार्षिक उत्पन्न ५९ हजाराच्या आत आहे.
या कुटुंबांना धान्य मिळावे, या मागणीसाठी राष्ट्रवादीने माेर्चा काढला हाेता. विराेधी पक्षनेते अजित पवार यांची भेट घेत निवेदन दिले हाेते. त्यांच्या निर्देशाने जिल्हाधिकाऱ्यांनी ऑनलाइन व प्रत्यक्ष चर्चा करत वंचितांना धान्याचा लाभ देण्याचे आश्वासन दिले हाेते. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी तत्काळ ५९ हजारांच्या आत वार्षिक उत्पन्न असलेल्या २२ हजार ५८८ नागरिकांना शासकीय दराप्रमाणे धान्य दिले जाईल,
असे लेखी पत्र दिले आहे. उर्वरित केशरी कार्डधारकांसाठी विशेष धान्य मागणीचा प्रस्ताव सादर केला आहे. यासंदर्भातील दाेन्ही पत्रे प्राप्त झाली आहेत. राष्ट्रवादीच्या आंदाेलनाला यश मिळून गरीबांच्या पदरात धान्य पडणार आहे. जीर्ण शिधापत्रिका बदलून देणे, नावांची नाेंदणी आदी प्रश्नही लवकरच साेडविले जाणार आहेत. त्यामुळे २६ डिसेंबरचे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात केले जाणारे घेराव आंदाेलन मागे घेतले आहे. याप्रसंगी माजी नगरसेवक अस्लम अन्सारी, शकील जानी बेग, निसार राशनवाला, कय्यूम अन्सारी उपस्थित हाेते.
२०० अंगणवाड्यांची गरज
अंगणवाड्यांची संख्या वाढविण्याची गरज असल्याचे शेख यांनी सांगितले. गरीब जनतेच्या मुलांसाठी किमान २०० अंगणवाड्यांची आवश्यकता आहे. अधिवेशनादरम्यान माजी आमदार रशिद शेख हे संबंधित विभागाच्या मंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे शेख यांनी स्पष्ट केले.
आमदार मुफ्तींवर टीका
आमदार मुफ्ती यांना विराेधकांच्या मागण्या, आंदाेलने हायजॅक करण्याची सवय लागली आहे. त्यांना काम करण्यास माेठी संधी आहे. त्यांनी आपल्या आमदारपदाचा उपयाेग करून विधानसभेत प्रश्न उपस्थित करावे. त्यांनी शहराच्या धान्यप्रश्नी एकही निवेदन मंत्र्यांना दिलेले नाही. मार्गी लागलेल्या कामांमध्ये हस्तक्षेप करून व्यत्यय आणू नये, अशी टीका शेख यांनी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.