आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्ज:10 जागांसाठी 23 अर्ज दाखल ; मनमाडच्या प्रगती बँकेच्या 15 जागांसाठी 35 उमेदवारी अर्ज

मनमाड10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दि प्रगती अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या १५ जागांसाठी दि. १७ जुलै रोजी निवडणूक होत आहे. त्यासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत म्हणजे दि. २० जूनपर्यंत या १५ जागांसाठी एकूण ३५ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. सर्वसाधारण १० जागांसाठी २३ अर्ज दाखल झाले आहेत.

नामनिर्देशनपत्रांची छाननी दि. २१ रोजी सकाळी ११ वाजता होऊन वैध नामनिर्देशनपत्रांची सूची २२ जूनला प्रसिद्ध करण्यात येईल. अर्ज माघारीची मुदत २२ जून ते ६ जुलैपर्यंत राहील. उमेदवारांची अंतिम यादी निशाणींचे वाटप करून ७ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. १७ जुलैला सकाळी ८ ते सायं. ४ वाजेपर्यंत मतदान होईल. तर १८ जुलैला मतमोजणीनंतर निकाल जाहीर करण्यात येईल. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नांदगावचे सहायक निबंधक चंद्रकांत विघ्ने यांची नियुक्ती केली आहे.

बातम्या आणखी आहेत...