आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

83ट्रान्सफाॅर्मरची तोडली वीज:सिन्नरला 20,000 शेतकऱ्यांकडे कृषिपंपांची 233 कोटी थकबाकी

सिन्नर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन दिवसापासून तालुक्यात कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा धडाका महावितरणने लावला आहे. ८३ ट्रान्सफार्मरचा पुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांत खळबळ उडाली आहे. दरम्यान, वीज बिल भरलेले ग्राहकही या कारवाईत भरडले गेले आहेत.

महावितरण अधिकाऱ्यांनी कारवाईला सुरुवात केल्याने शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. ऐन रब्बी हंगाम सुरू झाला आहे, त्यात तालुक्यात पर्जन्यमान चांगले आहे. विहिरीच्या पाण्यावर रब्बी हंगाम अवलंबून असून बहुतांश शेतकऱ्यांना दुसरा स्रोत नाही.

या भागात महावितरणची कारवाई : ठाणगाव, दापूर, देवपूर, वावी, वडांगळी, पाथरे, दातली, बारागाव पिंपरी, गुळवंच, पास्ते, सोनांबे, पांढुर्ली, नायगाव, चिंचोली या भागातील ट्रान्सफार्मर टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा धडाका महावितरणने हाती घेतला आहे. शेतकरी मुदत वाढवून देण्याची विनंती अधिकाऱ्यांना करत असले तरी त्यास दाद दिली जात नाही.

चालू देयक भरल्यास वीज पुरवठा सुरू करण्याची तजवीज
तालुक्यात ३३ हजार ५४५ कृषी ग्राहक आहेत. यातील २० हजार शेतकऱ्यांकडे २३३ कोटी रुपये बील थकले आहे. तथापि, शेतकऱ्यांबाबत लवचिक धोरण ठेवले असल्याने चालू बिल भरून पुरवठा सुरू ठेवता येणार आहे. ट्रान्सफार्मवरील सर्व शेतकऱ्यांनी चालू देयक भरल्यास वीजपुरवठा लगेचच सुरू करण्याची तजवीज केली आहे.

विजेबाबत बऱ्याच अडचणी
शेतकऱ्यांना विजेबाबत बऱ्याच अडचणी येत आहेत. अव्वाच्या सव्वा बिल दिले जाते. पूर्वसूचना न देता ट्रान्सफाॅर्मर बंद केले जात आहेत. दाब पुरेसा मिळत नाही. कृषिपंपांचे वीज मीटर रिडिंग घेतले जात नाही. ट्रान्सफाॅर्मर बंद केला जात असल्याने नियमित वीज भरणारे शेतकरीही भरडले जात आहेत. - रवींद्र पगार, शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते

बातम्या आणखी आहेत...