आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:25 गेटेड बंधाऱ्यांवरील स्थगिती उठवा

सटाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बागलाण तालुक्यातील मोसम व आरम नदीवर बांधण्यात येणाऱ्या प्रत्येकी सुमारे १०० हेक्टर सिंचन क्षमतेच्या २५ गेटेड सिमेंट काँक्रिट बंधाऱ्यांवरील स्थगिती उठवून शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी आमदार दिलीप बोरसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

बागलाण तालुक्यातील जास्तीतजास्त क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी मृद व जलसंधारण विभागाकडे मोसम व आरम नदीवर २५ गेटेड सिमेंट काँक्रिट बंधारे प्रस्तावित केले. शासनाने त्या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान केल्याचे आमदार दिलीप बोरसे यांनी पत्रात नमूद करून शासनाने मात्र त्या कामांना स्थगिती दिली आहे. मोसम आणि आरम नदीवर गेटेड बंधारे झाल्यास २ हजार ५०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येऊन शेतकरी सुजलाम‌् सुफलाम‌् होईल. त्यामुळे बागलाण तालुक्याचा विकास हाेईल.

शासनाने या सिमेंट काँक्रिट बंधाऱ्यांच्या कामावरील स्थगिती उठवून पुढील प्रक्रिया राबविण्यासाठी आपल्या स्तरावर आदेश व्हावेत, अशी मागणीही अामदार दिलीप बोरसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्राद्वारे केली आहे.

बातम्या आणखी आहेत...