आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:येवल्यात जलसंधारणाच्या कामांसाठी 27.87 कोटींचा निधी

येवला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिव्य मराठी विशेष : 33 नवीन सिमेंट काँक्रीट बंधारे बांधणार तर मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेतंर्गत 26 बंधाऱ्यांची दुरुस्ती

तालुक्यातील सिंचनाच्या एकूण ५९ कामासाठी २७ कोटी ८७ लाखांचा रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. एकूण ३३ नवीन सिमेंट काँक्रीट बंधारे बांधण्यात येणार असून मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेतंर्गत २६ बंधाऱ्यांची दुरुस्ती होणार आहे.

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या माध्यमातून तालुक्यातील शून्य ते शंभर हेक्टर सिंचन क्षमतेच्या एकूण ३३ गेटेड सिमेंट बंधाऱ्याच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून यासाठी एकूण २० कोटी ५३ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेच्या माध्यमातून २६ बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी प्रशाकीय मान्यता प्राप्त झाली आहे. यासाठी सहा कोटी ३४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

खरवंडी येथील क्रमांक १० बंधाऱ्यांसाठी ७५ ला‌ख ९ हजार, क्रमांक ११ च्या बंधाऱ्यासाठी ६२ ला‌ख ३३ हजार, चांदगाव येथील क्रमांक १ बंधाऱ्यासाठी ७२ ला‌ख ८७ हजार, क्रमांक २ च्या बंधाऱ्यासाठी ७७ ला‌ख ८४ हजार, अनकाई बंधाऱ्यासाठी ९३ ला‌ख ६५ हजार, रहाडी येथील क्रमांक ९ च्या बंधाऱ्यासाठी ६० ला‌ख ५६ हजार, रहाडी येथील क्रमांक १० च्या बंधाऱ्यासाठी ६५ ला‌ख ६३ हजार, ममदापूर येथील क्रमांक १३ च्या बंधाऱ्यासाठी ५३ ला‌ख ५७ हजार, क्रमांक १४ च्या बंधाऱ्यासाठी ५३ ला‌ख ५७ हजार, सोमठाणजोश गावठाण क्रमांक ८च्या बंधाऱ्यासाठी ६९ ला‌ख २ हजार, क्रमांक ९ च्या बंधाऱ्यासाठी ५७ ला‌ख २६ हजार, ममदापूर येथील क्रमांक १ बंधाऱ्यासाठी ६० ला‌ख ०८ हजार, क्रमांक २ च्या बंधाऱ्यासाठी ६० ला‌ख १६ हजार, क्रमांक ३ च्या बंधाऱ्यासाठी ६२ ला‌ख ६ हजार, खरवंडी येथील क्रमांक १ बंधाऱ्यासाठी ५५ ला‌ख ४० हजार, क्रमांक २ च्या बंधाऱ्यासाठी ६१ ला‌ख ७९ हजार, क्रमांक ३ च्या बंधाऱ्यासाठी ६१ ला‌ख ३४ हजार, क्रमांक ४ च्या बंधाऱ्यासाठी ५८ ला‌ख ८० हजार अशा एकूण १८ बंधाऱ्यांसाठी ११ कोटी ७३ ला‌ख ८० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. खरवंडी येथील क्रमांक ७ च्या बंधाऱ्यासाठी ६२ ला‌ख ६ हजार, क्रमांक ८ च्या बंधाऱ्यासाठी ६८ ला‌ख २६ हजार, क्र. ९ च्या बंधाऱ्यासाठी ५६ ला‌ख ६६ हजार, रहाडी येथील क्र. ३ च्या बंधाऱ्यासाठी ६६ ला‌ख २५ हजार, क्र. ४ च्या बंधाऱ्यासाठी ७० ला‌ख ७७ हजार, क्र. ५ च्या बंधाऱ्यासाठी ६६ ला‌ख ७१ हजार, क्र. ६ च्या बंधाऱ्यासाठी ५८ ला‌ख ७९ हजार, रहाडी येथील ७ च्या बंधाऱ्यासाठी ५५ ला‌ख ०६ हजार, क्र. ८ च्या बंधाऱ्यासाठी ५९ ला‌ख ६७ हजार, ममदापूर येथील १० च्या बंधाऱ्यासाठी ६० ला‌ख ४२ हजार, क्र. ११ बंधाऱ्यासाठी ५० ला‌ख ६१ हजार, क्र. १२ च्या बंधाऱ्यासाठी ४८ ला‌ख ७० हजार, सोमठाण जोश येथील क्र.५ बंधाऱ्यासाठी ७० ला‌ख १० हजार, क्रमांक ६ बंधाऱ्यासाठी ६२ ला‌ख ७५ हजार, क्रमांक ७ बंधाऱ्यासाठी ५२ ला‌ख ६ हजार या एकूण १५ बंधाऱ्यासाठी ९ कोटी ८ ला‌ख ९१ हजार रुपये निधीस मंजुरी मिळाली आहे.

बातम्या आणखी आहेत...