आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्नीतांडव:मालेगाव येथे लागलेल्या आगीत 3 घरे जळून खाक; 2 लाख 20 हजारांचे नुकलान

मालेगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील गांधीनगर परिसरात महमूदिया कॉलनीमध्ये बुधवारी लागलेल्या आगीत ३ घरे जळून खाक झाल्यामुळे ३ गरीब मुस्लिम बांधव उघड्यावर आले आहेत.

महमूदिया कॉलनी येथील अताउल्ला खान हिदायत खान यांच्या घराला अचानक आग लागली. तीव्र उन्हामुळे आगीने क्षणातच रौद्ररूप धारण केले. या आगीत शेजारी राहणारे सलीम खान शेरखान खान व शाहिदा बी नूर खान यांच्याही घरांना कवेत घेतले. आगीमुळे घरातील कोणतीही वस्तू वाचवणे शक्य झाले नव्हते. आगीमुळे सलीम खान यांच्या घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोटात तिन्ही घरातील टीन पत्रे हवेत उडाली होती. मालेगाव नगर पंचायतीची १००० लिटर क्षमता असलेले फायर ब्रिगेडचे पथक आग विझवण्यात अयशस्वी ठरल्यामुळे वाशीम नगर परिषदेतील फायर ब्रिगेडने आग आटोक्यात आणली. परंतु, तोपर्यंत तिन्ही घरांची राख झाली होती. रमजान महिन्यातच ३ मुस्लिम परिवारांचा उघड्यावर येण्याची वेळ आली आहे. हे तिनही परीवार मंजूरी करून आपला चरितार्थ चालवतात. आगीमुळे अपंग असलेल्या अताउल्ला खान यांचे जवळपास २ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तर शाहिदा बी नूर खान यांचे १ लाख ३० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रमाणे सलीम खान शेरखान यांची रोख रक्कम जळाल्यामुळे त्यांचे जवळपास २ लाख २० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

मालेगाव येथील अग्निशमन दलाच्या गाडीचा घोटाळा नागरिकांच्या जीवावर उठला असून त्या गाडीने साधी आग आटोक्यात येत नाही. नगर पंचायत सदस्य निधी असताना लहान गाडीसाठी या सदस्यांनी मंजुरी का दिली, याची शहरामध्ये चर्चा होती.

बातम्या आणखी आहेत...