आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कारवाई:भारमला गावठी पिस्तुलासह 3 जिवंत काडतुसे जप्त; 35900 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

येवला13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारम येथे एका गावठी पिस्तुलासह ३ काडतुसे जप्त केली असून एका आरोपीला अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

तालुका परिसरात अवैध हत्यार शोधमोहीम सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तालुक्यातील रहाडी-भारम रस्त्यावरील भारम बस थांबा परिसरात शोधाशोध केली. यावेळी संशयित आरोपी वाल्मीक दिलीप गांजे (२९) याची संशयावरून झाडाझडती घेतली असता त्याच्या ताब्यात २५ हजार रुपये किमतीचा ७.६५ एम. एम. बॅरल असलेला गावठी बनावटीचा कट्टा, लांबी १७ सेंमी, मुठीची उंची ११ सें.मी. आहे. तीन जिवंत काडतुसे, मोबाइल असा ३५,९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. हवालदार उदय पाठक, प्रवीण सानप, पोलिस नाईक प्रशांत पाटील, विश्वनाथ काकड आदींनी या कारवाईत सहभाग घेतला होता. सदर आरोपीला पुढील कारवाईसाठी येवला तालुका पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्यांला न्यायालयात हजर केले असता २० जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

बातम्या आणखी आहेत...