आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापोषण आहाराचे रखडलेल्यापैकी ७० टक्के अनुदान वितरित झाले असले तरी ३० टक्के अनुदानाची प्रतीक्षा अजूनही आहे. पाच महिन्यांपासून राज्यातील शाळांचे पोषण आहार अनुदान वितरित झालेले नव्हते. पोषण आहार योजना सुरू झाल्यापासून दीर्घकाळ अनुदान रखडण्याची ही पहिलीच वेळ आहे. तालुक्याचे एकूण एक कोटीरुपयांचे अनुदान रखडले होते.
तालुक्यात इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गातील एकूण ३७ हजार २७ विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येतो. मात्र, जून महिन्यापासून पोषण आहाराचे अनुदान वितरित झालेले नव्हते. संपूर्ण राज्यभरातच अशी स्थिती होती. पोषण आहाराच्या खिचडीसाठी इंधन, भाजीपाल्याचे पैसे पाच महिन्यांपासून थकल्याने मुख्याध्यापकांना हा भार सहन करावा लागत होता.
अनुदानाअभावी खिचडीही बेचव झाली होती. इंधन, भाजीपाला, खाद्यतेलाच्या खर्चाचा समावेश करून प्रतिविद्यार्थी एका दिवसाला १ ते ५ इयत्तेकरिता २ रुपये ६८ पैसे, ६ ते ८ करिता ४ रुपये ०२ पैसे असे अनुदान निश्चित आहे.
३०% अनुदान रखडलेलेच
इंधन, भाजीपाला, तेल, मीठ, मिरची, कडधान्य आदींसाठी मिळणारे ७० टक्के अनुदान वितरित झाल्याने मुख्याध्यापकांचा जीव भांड्यात पडला आहे. अनुदानाचे ७० लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत. तर अजूनही ३० लाख रुपयांच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत मुख्याध्यापक व मदतनीस आहेत.
मदतनीसांची दीपावली झाली गोड
तालुक्यात ६१३ मदतनीसांना मानधन देण्यात येते. पोषण आहार शिजवून देण्यासाठी महिन्याला १५०० मानधन मिळते. यातील ६०७ मदतनीसांना दीपावलीच्यामहालक्ष्मी पूजन दिवसापर्यंत मानधन बँक खात्यावर वर्ग करण्यात आले आहे. त्यामुळे पाच महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेले मानधन मिळाल्याने मदतनीसांचीदीपावली गोड झाली आहे. तर सहा मदतीसांच्या बँक खात्याची माहिती पुरेशी नाही. काहींचे बँक खाते बंद आहे. अशा सहा मदतनीसांचे मानधन वर्ग होणे बाकी आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.