आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंधाऱ्याला समृद्धी:३० हजार डंपर गाळ उपसा जलसाठ्यात तीनपट वाढ; जगबुडी बंधाऱ्याचे रूपांतर लघू प्रकल्पात

संपत ढोली | सिन्नर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डुबेरेवाडी येथील जगबुडी बंधाऱ्यातील गाळासह गौण खनिजाचा उपसा केल्याने बंधाऱ्याचा जलसाठा तीनपटीने वाढला आहे. अवघ्या सात दलघफू क्षमता असलेल्या या बंधाऱ्यात आता एकूण २३.९५ दलघफू साठा झाला आहे. लहानशा बंधाऱ्यालाच समृद्धी प्राप्त झाल्याने त्याचे रूपांतर आता लघू प्रकल्पात झाले आहे. माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी समृद्धी महामार्गासाठी सुरुवातीपासूनच डुबेरेवाडी येथील जगबुडी बंधाऱ्यातील गाळ उपसा करण्याची सूचना ठेकेदार कंपनीला केली होती. त्यानंतर दोन वर्षांत तब्बल ३० हजार डंपर गाळ व गौण खनिजाचा उपसा करण्यात आला. बंधाऱ्याची खोली ३० फुटांनी वाढविण्यात आली आहे.

१७ दलघफू पाणीसाठ्याची भर
बंधाऱ्यात गाळ उपशापूर्वी केवळ ७ दशलक्ष घनफूट जलसाठा होत होता. दोन वर्षांत चार लाख ८० हजार क्यूबिक मीटर इतका गाळ व गाैण खजिन उपसा झाला. त्यामुळे बंधाऱ्यात १६.९५ दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याची भर पडली आहे.

पाच किलोमीटर अंतरासाठी वापर
जगबुडी बंधाऱ्यातून उपसा केलेला गाळ व गौण खनिजापासून पाच किलोमीटर अंतराचा समृद्धी महामार्ग तयार झाला आहे. टप्पा क्रमांक १२ मधील डुबेरे शिवारातून जाणाऱ्या या महामार्गासाठी खनिजाचा वापर करण्यात आला.

परिसराला लाभदायक काम
पाणीसाठा वाढल्याने त्याचा परिसराला निश्चित फायदा होईल. दीर्घकाळ लाभ देणारे काम झाले आहे. तालुक्यातील जलसाठे वाढविण्यावर सुरुवातीपासूनच आपला भर राहिला आहे.
- राजाभाऊ वाजे, माजी आमदार

बातम्या आणखी आहेत...