आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअर्थसंकल्पात रस्ते व पुलांची विविध विकासकामे मंजूर झाली अाहे. यासाठी ३१ कोटी ९० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे मतदारसंघातील रस्त्यांना झळाळी मिळणार असून नागरिकांना दळणवळणाच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहे. माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्यामुळे विविध योजनांच्या माध्यमातून अनेक विकासकामे मंजूर झाली आहे. मातुलठाण - धामणगाव - अंदरसूल ते बोकटे रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग १६१ किमी ५/३०० ते ८/०० मध्ये रुंदीकरण व डांबरीकरण करण्यासाठी एक कोटी ५० लाख, पाटोदा-सातारे-एरंडगाव-रवंदा प्रमुख जिल्हा मार्ग १७८ रस्त्याची ३/५०० ते १०/८०० मध्ये सुधारणा करण्यासाठी तीन कोटी ९० लाख, येवला - नागडे - धामणगाव - भारम - वाघाळे - छत्रपती संभाजीनगर हद्द रस्ता राज्य महामार्ग ४१२ सा.क्र.१५/४०० ते १६/०० वर १६ /३०० ते २७/५०० या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी तीन कोटी ५० लाख, राज्य महामार्ग ७ ते लासलगाव - सोमठाणदेश - पाटाेदा - ठाणगाव - सावरगाव - धामोडे - नगरसूल - वाईबोथी - न्याहारखेडे खुर्द - भारम ते राज्य महामार्ग ४१२ ला मिळणारा रस्ता राज्य महामार्ग ४५२ मध्ये २८/०० ते २९/०० व ३५/८०० ते ३९/०० या लांबीत रस्ता रुंदीकरणासह मजबुतीकरण करण्यासाठी ३ कोटी तर नाशिक-निफाड-येवला रस्ता १९६/०० ते २०१/०० या रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी ६ कोटी रुपये, नाशिक - निफाड - येवला - वैजापूर - छ. संभाजीनगर रस्त्यावर गोई नदीवर सा.क्र.२०९/१०० मध्ये मोठ्या पुलाचे पुनर्बांधणी करण्यासाठी व २०२/५०० ते २०६/५०० या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ७.५० कोटी रुपये निधी असा एकूण २५ कोटी ४० लाख रुपये निधीच्या विकास कामांना मंजुरी मिळाली आहे.
निफाड तालुक्यातील डोंगरगाव विंचूर रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग १२५ मध्ये ३६/४०० ते ३७/७०० या रस्त्याचे काँक्रिटीकरण व गटारीचे बांधकाम करण्यासाठी १ कोटी ५० लाख, कोळगाव ते कानळद रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग १०५ किमी ११/९०० ते १४/९०० ची सुधारणा करण्यासाठी एक कोटी ५० लाख, विंचूर-विठ्ठलवाडी-काेटमगाव रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग ४०/०० ते ४१/५०० ची सुधारणा करण्यासाठी एक कोटी, निमगाव वाकडा- भरवसफाटा ते देवगाव रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग १८७ मध्ये ५/०० ते १०/०० रस्त्याची सुधारणा करण्यासाठी दाेन कोटी ५० लाख असे एकूण सहा कोटी ५० लाखांच्या विविध विकासकामांना मंजुरी मिळाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.