आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी मनपा प्रशासक तथा आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी सुरू केलेली मोहीम तीव्र झाली आहे. मागील पाच दिवसांत तीन प्रभागांमधील ३५३ अतिक्रमणे हटवून रस्ते, गटारी, नाले व अनेक भूखंड मोकळे करण्यात आले. अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटत नाही तोपर्यंत ही मोहीम सुरूच रहाणार आहे.
प्रशासकपदाची सूत्रे हाती घेताच प्रशासक गोसावी यांनी अतिक्रमणांवर हातोडा मारला. चार प्रभागात कारवायांसाठी दोन पथके नियुक्त केली आहेत. मोहिमेच्या पाचव्या दिवशी प्रभाग क्रमांक एक, दोन व चारमधील अतिक्रमणांचे निर्मूलन करण्यात आले. सुलेमानी चौक ते जामेतूल स्वालेआत व जुन्या आझादनगर पोलिस चौकीपर्यंतची अतिक्रमणे हटविली. गटारींवरचे स्लॅब तोडण्यात आले. अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी, उपायुक्त सतीश दिघे, अतिक्रमण विभागाचे सहायक आयुक्त सुनील खडके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग अधिकारी जगदीश बडगुजर, श्याम बुरकूल, अब्दुल कदिर अब्दुल लतिफ, अतिक्रमण अधीक्षक श्याम कांबळे, सुनील खैरनार, विनय शिंदे, शैलेश सोळंकी मोहीम राबवत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.