आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदान केंद्र:नांदगाव तालुक्यात 40 मतदान केंद्र

नांदगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील पंधरा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान होत असून निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. पंधरा ग्रामपंचायतींसाठी एकूण ४० मतदान केंद्र असणार आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रत्येक ठिकाणी केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, सेवक अशा पद्धतीने दोनशे अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

शनिवारी दुपारी येथील प्रशासकीय संकुलात मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांची जबाबदारी सांगून मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच नागरिकांनी मतदानासाठी येताना ओळखीचा योग्य पुरावा सोबत आणण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिस यंत्रणादेखील सज्ज झाली असून निवडणुकीत अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस निरीक्षक - १ सहायक पोलिस निरीक्षक - २, पोलिस उपनिरीक्षक - २, पोलिस कर्मचारी - ३९, होमगार्ड - ५५ याप्रमाणे नेमणूक करण्यात आली आहे. पंधरा ग्रामपंचायतींपैकी तीन ग्रामपंचायतींच्या सरपंचाची निवड अविरोध झाली आहे. रविवारी सरपंचपदासाठी १२ ग्रामपंचायतीत ३३ उमेदवार रिंगणात आहेत. तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्यपदासाठी १७५ उमेदवार रिंगणात आहे.

बातम्या आणखी आहेत...