आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाचा जोर वाढला:चणकापूर धरणातून चार हजार क्युसेक विसर्ग सुरू

मालेगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चाेवीस तासांत चणकापूर धरण क्षेत्रात ६३ तर हरणबारी परिसरात ४० मिलिमीटर पाऊस पडला आहे. पावसामुळे जलस्तर वाढल्याने मंगळवारी सकाळपासून चणकापूर धरणातून ४ हजार व हरणबारीतून १६०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या विसर्गाने गिरणा व माेसम नद्या पुन्हा खळाळून वाहू लागल्या आहेत.दाेन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जाेर वाढला आहे.

काही भागात मुसळधार तर काही ठिकाणी पाऊस सुरू आहे. चाेवीस तासांत चणकापूर धरणाच्या क्षेत्रात ६३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. धरणाचा जलस्तर वाढताच पाण्याचा विसर्ग वेगाने सुरू झाला आहे. चणकापूरमधून ४ हजार क्युसेक पाणी साेडण्यात आले आहे. तुडुंब भरलेल्या हरणबारी धरणातूनही १६०० क्युसेक पाणी साेडले आहे. पूनद धरणातून साधारण १५०० क्यसुेक पाण्याचा विसर्ग हाेत आहे. ठेंगाेडा बंधाऱ्यातून गिरणा नदीपात्रात ६ हजार ३०० क्युसेक पाणी वाहत आहे. माेसम नदीपात्रातही हरणबारीचे १६०० क्युसेक पाणी गिरणा धरणाच्या दिशेने खळाळत आहे. दाेन्ही नद्यांच्या काठावरील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना कळवण पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी सुधीर पगार यांनी दिल्या.

गिरणा धरणाचेही सहा दरवाजे उघडले
गिरणा धरणात येणारी पाण्याची आवक लक्षात घेऊन सकाळी सहा वक्रद्वारे उघडण्यात आली आहे. दाेन वक्रद्वारे २ फुटाने तर चार वक्रद्वारे एक फुटाने वरती उचलली आहेत. धरणातून ९ हजार ५०४ क्युसेक पाणी वाहत आहे. पाण्याची आवक बघून विसर्ग कमी किंवा जास्त केला जाणार आहे. मंगळवारी धरण क्षेत्रात सहा मिमी पाऊस पडला आहे.

बातम्या आणखी आहेत...