आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदार:जायखेडा ग्रामपंचायतीसाठी 6270 पैकी 4192 मतदारांनी बजावला हक्क

जायखेडाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जायखेडा येथील ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचासह सदस्यपदासाठीच्या निवडणुकीत ६६.८५ टक्के मतदान झाले. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. एकूण ६२७० मतदारांपैकी ४१९२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

यात १८०७ महिला तर २२८६ पुरुषांनी मतदानाचा हक्क बजावला. बागलाण तालुक्यातील सर्वात माेठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या जायखेडा ग्रामपंचायतीची थेट सरपंचपदाची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. जायखेडा सरपंचपद हे अनुसूचित जातीसाठी असल्यामुळे पाच उमेदवार रिंगणात होते. सदस्य पदाच्या ५ जागा अविरोध झाल्याने उर्वरित १२ जागांसाठी ३१ उमेदवार निवडणूक रिंगणात हाेते. सर्वांच्या नजरा आता निकालाकडे लागल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...