आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी चिंतेत:दहा दिवसांत टोमॅटो भावात क्रेटमागे 450 रुपयांची घसरण

पिंपळगाव बसवंतएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश येथील टाेमॅटाे बाजार समितीत विक्रीसाठी येत असल्याने टाेमॅटाे दरात २० किलाेच्या क्रेटमागे आठ ते दहा दिवसांत ४०० ते ४५० रुपयांची घसरण झाली आहे. सध्या टोमॅटोला २५० ते ३७० तर सरासरी ३२५ रुपयांपर्यत भाव मिळत आहे. तर किरकाेळ बाजारात २५ ते ३० रुपये किलाेने टाेमॅटाे विकले जात आहे.

दिवाळीअगोदर टाेमॅटाेचे ८७१ रुपयांपर्यंत दर गेले हाेते. मात्र दिवाळीनंतर कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश येथील टाेमॅटाे सुरू झाला आहे. यामुळे भावात घसरण हाेण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दिवाळी अगोदर दर ८७१ रुपयांपर्यंत गेले हाेते. गुरुवारी पिंपळगाव बाजार समितीत टाेमॅटाेची ९५,३३२ क्रेटची आवक झाली. भाव जास्तीत जास्त ३८१, कमीत कमी ४१ तर सरासरी २३१ रुपये मिळाले.

दुबईत मागणी कमी
दुबईमध्ये जॉर्डन व इराणचा माल येत असल्याने भारतीय टोमॅटोची मागणी कमी झाली. याचा फटका निर्यातीवर बसला आहे, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

दर कमी होण्याची शक्यता
पिंपळगाव बाजार समितीतील टोमॅटोचा हंगाम शेवटच्या टप्प्यात आल्याने या ठिकाणी उत्पादन कमी होत आहे. इतर ठिकाणचा माल वाढत असल्याने भावात मोठी घट होत आहे. येत्या काळात अजून दर कमी होणार आहे. - दानिश पठाण, व्यापारी

तीन राज्यांत आवक वाढल्याने दरात घट
कर्नाटकमधील म्हैसूर, काेलार, मंड्या, आंध्र प्रदेशातील मदनपल्ली, अनंतपूर तर मध्य प्रदेशातील शिवपुरी, छिंदवाडा, बडवानी या जिल्ह्यांतील टाेमॅटाे जादा प्रमाणात विक्रीसाठी येत आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील दरावर माेठा परिणाम झाला आहे. थाेड्याच दिवसांत रतलाम जिल्ह्यातील टाेमॅटाे विक्रीसाठी येणार असल्याने भाव अजून घसरण्याची शक्यता आहे.- बाळासाहेब म्हैसधुणे, टाेमॅटाेतज्ज्ञ, मुंगसरा

बातम्या आणखी आहेत...