आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्टिमेटम:​​​​​​महापालिका हद्दीत केलेले अतिक्रमण स्वत: हून हटविण्यासाठी अतिक्रमण करणाऱ्यांना 48 तासांचा अल्टिमेटम

मालेगाव18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

या वेळेत अतिक्रमण न हटविल्यास मनपा प्रशासन अतिक्रमणांवर हातोडा मारून धडक कारवाई करणार आहे. अतिक्रमण निर्मूलनास विरोध करणाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याचा इशारा मनपा प्रशासक भालचंद्र गोसावी यांनी दिला आहे.

प्रशासकपदाची सूत्रे हाती घेताच आयुक्त गोसावी यांनी शहरातील अतिक्रमणाचा विषय रडारवर घेतला आहे. शहरातील रस्ते, सर्व गटारी, नाले, मनपाच्या मोकळ्या जागांवरील अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही केली जाणार आहे. ही मोहिम राबविण्यापूर्वी अतिक्रमण करणाऱ्यांना स्वत:हून आपली अतिक्रमण हटविण्यासाठी ४८ तासांचा अवधी देण्यात आला आहे. संबंधितांनी कारवाईपूर्वीच आपली अतिक्रमणे काढून घ्यावी. यानंतर मनपा अतिक्रमण हटवून साहित्य, माल जप्त करणार आहे. अतिक्रमण हटविण्यास कुणी विरोध केला किंवा बाधा आणण्याचा प्रयत्न केल्यास फौजदारी कारवाई केली जाईल. नागरिकांनी अतिक्रमण हटवून सहकार्य करण्याचे आवाहन गोसावी यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...