आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी ४८३ उमेदवारी अर्ज दाखल झाले. यात सरपंचपदासाठी ६८ तर सदस्यपदांचे ४१५ अर्ज समाविष्ट आहे. राेंझे ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदासाठी सुमन अभिमन गायकवाड यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची अविराेध निवड निश्चित मानली जात आहे. दिवसभरात ऑफलाइनद्वारे सरपंचपदाचे ५५ तर सदस्यपदासाठी ३७० उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.
दाभाडी, साैंदाणे, वजीरखेडे, टाेकडे, जाटपाडे, माल्हनगाव, निंबायती, शिरसाेंडी, पाटणे, करंजगव्हाण, माेहपाडे, चाैकटपाडे व राेंझे या १३ ग्रामपंचायतींची निवडणूक हाेत आहे. गुरुवारपर्यंत सरपंचपदासाठी १३ तर ४५ अर्ज सदस्यपदाचे ऑनलाइन पद्धतीने दाखल झाले हाेते. निवडणूक आयाेगाने ऑफलाइन अर्ज स्वीकृतीस परवानगी दिल्याने शुक्रवारी सकाळपासून तहसील कार्यालयात इच्छुकांची अर्ज भरण्यास गर्दी झाली हाेती. दाेन स्वतंत्र कक्षात अर्ज स्वीकारण्यासाठी ग्रामपंचायतनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत बसून हाेते. सदस्यपदासाठी सर्वाधिक ११२ अर्ज दाभाडी ग्रामपंचायतीसाठी दाखल झाले आहेत. दाखल अर्जांची ५ डिसेंबरला छाननी हाेणार आहे.
ग्रामपंचायत प्रभाग सदस्य उमेदवार
वजीरखेडे ०४ १२ ५९
पाटणे ०५ १६ ५०
साैंदाणे ६ १८ ४०
करंजगव्हाण ०५ १४ २७
राेंझे ०३ ०८ १७
शिरसाेंडी ०३ १० २१
माल्हनगाव ०३ ०८ १६
टाेकडे ०३ १० २७
माेहपाडे ०३ ०८ २१
जाटपाडे ०३ १० २१
चाैकटपाडे ०३ ०८ २५
निंबायती ०४ १२ ३७
दाभाडी ०६ १८ १२२
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.