आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा‎ दाखल:वाहेगावसाळ येथे घरफोडीत 49  हजारांचा ऐवज लंपास‎

चांदवड‎12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाहेगावसाळ शिवारातील दत्तनगर येथील राहत्या‎ घरात अज्ञात चोरट्याने भरदुपारी घरफोडी करुन‎ घरातील सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण ४९‎ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याबाबत चांदवड‎ पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा‎ दाखल करण्यात आला आहे.‎ याबाबत सिंधुबाई काशीनाथ भवर (६०, रा.‎ दत्तनगर, वाहेगाव शिवार, ता. चांदवड) यांनी‎ चांदवड पोलिसांत फिर्याद दिली.‎

रविवारी (दि. १२) दुपारी ११ ते २ वाजेच्या सुमारास‎ अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे‎ कुलूप तोडून आत प्रवेश केला व घरातील ३० हजार‎ रुपये किमतीची सोन्याचे मणी असलेली बोरमाळ, ४‎ हजार रुपये किमतीचे सोन्याचे वेल व १५ हजारांची‎ रोकड असा एकूण ४९ हजार रुपयांचा ऐवज चोरुन‎ नेला. याबाबत चांदवड पोलिसांत अज्ञात‎ चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात‎ आला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...