आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच सदस्यांचे सदस्यत्व अपात्र:तळेगावरोही उपसरपंचांसह ५ सदस्य अपात्र; अपर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आदेश कायम

चांदवड5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील तळेगावरोही ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आलेल्या कामांच्या बदल्यात केलेल्या आर्थिक व्यवहारात प्रत्यक्ष संबंध असल्याचे स्पष्ट झाल्याने अपर आयुक्त भानुदास पालवे यांनी मालेगाव अपर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कायम ठेवत तळेगावरोहीचे उपसरपंच बाबाजी वाघचौरे यांच्यासह पाच सदस्यांचे सदस्यत्व अपात्र ठरविले आहे.

ग्रामपंचायतीत २०१७-२०२१ दरम्यान वित्त आयोगांच्या निधीमध्ये दलित विकास निधी, ग्रामनिधीमध्ये भ्रष्टाचार व गावठाणात अतिक्रमण, गावातील रस्ते, पाइपलाइन अशा कामांमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत अन्वर पठाण यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. यानुसार चौकशी समितीने मालेगावच्या अपर जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर केला. त्यावर अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार निकाल देत उपसरपंच बाबाजी गोविंद वाघचौरे यांच्यासह अर्चना सुनील ठाकरे, योगिता शरद कदम, कांताबाई सुरेश भोकनळ, निर्मला तुकाराम घुमरे या पाच सदस्यांना अपात्र ठरविले होते. याबाबत या सदस्यांनी नाशिक विभागाच्या अपर आयुक्तांकडे अपील दाखल केले होते. मात्र, ग्रामपंचायतीमार्फत केलेल्या कामांच्या बदल्यात आर्थिक व्यवहारात संबंध व शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याचे स्पष्ट झाल्याने अपर आयुक्त भानुदास पालवे यांनी सदस्यांचे अपील फेटाळत मालेगाव अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे यांचा आदेश कायम ठेवला. ग्रामपंचायत अधिनियमान्वये उपसरपंचांसह पाच सदस्यांचे सदस्यत्व अपात्र ठरविले आहे.

कार्यवाही लवकर करावी
संबंधित निलंबित झालेल्या उपसरपंच व सदस्यांवर शासनाने फौजदारी गुन्हे दाखल करून पुढील कायदेशीर कार्यवाही लवकरात लवकर करावी.
सुखदेव केदारे, जिल्हा संघटक, किसान सभा

बातम्या आणखी आहेत...