आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाेलिस बंदाेबस्त:मालेगावी यंदा 50% वाढीव पाेलिस बंदाेबस्त

मालेगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

यंदाच्या गणेशाेत्सवात गतवर्षाच्या तुलनेत ५० टक्के वाढीव पाेलिस बंदाेबस्त तैनात करण्यात आला आहे. राज्य राखीव पाेलिस दल व दंगा नियंत्रण पथकांच्या चार कंपन्यांसह ३६३ पाेलिस कर्मचारी व ३६५ गृहरक्षक दलाच्या जवानांचा खडा पहारा सुरू आहे. शुक्रवारी (दि. ९) गणरायाचे विसर्जन हाेत आहे. त्यामुळे या दिवशी मिरवणुकांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे.

गतवर्षी काेविड निर्बंध पाळून गणेशाेत्सव साजरा करावा लागला हाेता. प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी सार्वजनिक उपक्रम व मिरवणुकांना मनाई केली हाेती. मंडळांनी मिरवणुका न काढता जवळील गणेशकुंडांमध्ये गणरायाचे विसर्जन केले हाेते. मात्र, यंदा कुठलेही निर्बंध नसल्यामुळे गणेशभक्तांचा उत्साह शिगेला पाेहाेचला आहे. येणाऱ्या काळात मनपा, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजणार असल्याने अनेक इच्छुक जनसंपर्क वाढविण्यासाठी गणेशाेत्सवाची संधी साधत आहेत.

कुणाच्या व्यक्तीगत किंवा राजकीय स्वार्थापाेटी कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण हाेऊ नये याची पाेलिस प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. महत्त्वाच्या गणेश मंडळांसह संवेदनशील भागांमध्ये अगाेदरच बंदाेबस्त तैनात आहे. शहर व कॅम्प विभागानुसार बंदाेबस्ताचे नियाेजन झाले आहे. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पाेलिस महानिरीक्षक डाॅ. बी. जी. शेखर-पाटील, पाेलिस अधीक्षक सचिन पाटील हे शहराच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. विसर्जन मिरवणुका शासनाच्या निर्धारित वेळेत व शांततेत पूर्ण हाेतील असा विश्वास अपर पाेलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी व्यक्त केला आहे.

बातम्या आणखी आहेत...