आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:50 कि.मी. रॅलीतून पर्यावरणरक्षणाचा संदेश ; सायकलदिनी सिन्नर सायकलिस्टचा अनोखा उपक्रम

सिन्नरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधून सिन्नर सायकलिस्ट असोसिएशनच्या वतीने ५० किलोमीटर सायकल रॅली काढून हा दिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. जागतिक सायकल दिनानिमित्त आपले आरोग्य चांगले रहावे, इंधनाची बचत होऊन पर्यावरणाचे संवर्धन व्हावे या हेतूने जनजागृती करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली. ‘सायकल चालवा पर्यावरण वाचवा, देखना है कल, तो चलाओ सायकल’ अशा घोषणा देण्यात आल्या. शुक्रवारी (दि. ३) जागतिक सायकल दिनानिमित्त सिन्नर सायकलिस्ट असोसिएशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून सिन्नर शहर ते बारागावपिंप्री, निमगाव, म्हाळसाकोरेमार्गे नांदूरमध्यमेश्वर आणि तेथून पुन्हा सिन्नर अशी ५० किमीची सायकल रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये सिन्नर सायकलिस्टचे अध्यक्ष नितीन जाधव, रामभाऊ लोणारे, मुकेश चव्हाणके, अमोल चव्हाणके, उदय गायकवाड, शिवाजी लोंढे, अनिल कवडे, अमोल कवडे, भास्कर गोजरे, संजय आनेराव, पुंडलिक झगडे, योगेश थोरात, ज्ञानेश्वर सुंबे, नंदकिशोर निऱ्हाळी, संजय गुजर, संतोष कदम, मंगेश क्षत्रिय, सुरज देशमुख, डॉ. भानुदास आरोटे, राम कासार यांनी सहभाग घेतला. राजाराम मुंगसे यांनी सिन्नर वकील संघ व सिन्नर न्यायालयाच्या वतीने सहभागी सायकलिस्टचे स्वागत केले.

बातम्या आणखी आहेत...