आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद येथील ‘मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड अॅ ग्रीकल्चर (मसिया)’ आणि ‘टाटा टेक्नॉलॉजीज्’ यांनी आयोजित केलेल्या ‘इनोव्हेटिव्ह आयडिया अॅक्सिलरेटर प्रोग्राम’ स्पर्धेत येथील स्व. कांताबाई भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी बनविलेल्या ‘स्वयंचलित पोल्ट्री फार्म’ प्रकल्पाची निवड होऊन महाविद्यालयाला २० हजार रुपये निधी पहिल्या राउंडसाठी प्राप्त झाला असून पुढील राउंडसाठी ३० हजार रुपये वितरीत करण्यात येणार आहे. महाविद्यालयातील अंतिम वर्षातील संगणक शाखेतील विद्यार्थिनी महिमा कासलीवाल, ऋतुजा देशमाने, लिशा जैन व तेजस्विनी मुथा यांनी प्रा. डी. एस. राजनोर व प्रा. पी. एम. बोरा यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प सादर केला. हा प्रकल्प महाविद्यालयाच्या वर्कशॉपमध्येच तयार करण्यात आला. पहिल्या फेरीत नावीन्यता, किफायतशीरपणा, विशिष्टता, व्यवहार्यता आणि बाजारातील मागणी या आधारावर संघ कल्पना निवडण्यात आली.
तर दुसऱ्या राउंडसाठी सहभागी संघाने ज्युरीला त्यांचा कृती आराखडा, व्यवसाय मॉडेल कॅनव्हास, प्रोटोटाइप इत्यादी सादर केला. प्रकल्पासाठी प्रकल्प गाइड प्रा. डी. एस. राजनोर, इ.डी.सी प्रमुख प्रा. पी. एम. बोरा, संगणक विभागप्रमुख डॉ. के. एम. संघवी, उपप्राचार्य डॉ. एम. आर. संघवी, प्राचार्य डॉ. एम. डी. कोकाटे यांनी विशेष मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थिनींचे संस्थेच्या विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष दिनेशकुमार लोढा, सेक्रेटरी जवाहरलाल आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजितकुमार सुराणा, उपाध्यक्ष अरविंदकुमार भन्साळी, सहमानद सचिव झुंबरलाल भंडारी, सुनीलकुमार चोपडा, प्राचार्य डॉ. एम. डी. कोकाटे, उपप्राचार्य डॉ. एम. आर. संघवी, विश्वस्त व प्रबंध समितीचे पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.
पोल्ट्री फार्मच्या उद्योगाला मिळणार बळकटी
या प्रकल्पामुळे तापमानाला अनुसरून पंखा, लाइट, पडदे हे स्वयंचलित चालू किंवा बंद होणे, पोल्ट्री खाद्याचे योग्य प्रमाणात वाटप होणे, मोबाइल अॅपद्वारे रनटाइम फार्मचे तापमान, आर्द्रता, गॅस लेव्हल यांचे रीडिंग मिळणे, प्रति दिवसाचे रेकॉर्ड जतन करणे, विविध लसीकरणाच्या नोटिफिकेशन, खाद्य मोजणी हे मोबाइल अॅपद्वारे उपलब्ध करून देणे, तसेच कूलिंग पॅड्सएेवजी वॉटर फॉगरचा वापर केल्याने शेतकऱ्यांना कमीतकमी खर्चात जास्तीत जास्त फायदा होणार आहे. विशेष म्हणचे फार्ममधील योग्य अनुकूल तापमानामुळे पक्षांचे मृत्युदराचे प्रमाण अत्यल्प होऊन या प्रकल्पामुळे पोल्ट्री फार्मच्या उद्योगाला बळकटी प्राप्त होईल आणि शेतकऱ्याचा व प्रामुख्याने देशाच्या आर्थिक विकासात मदत होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.