आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासमृद्धी महामार्गाच्या उभारणीसाठी गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांमुळे ग्रामीण रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. तालुक्यातील ५१ रस्त्याचे २८२ किमीचे ९८ कोटी ७० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, याबाबत लोकप्रतिनिधींच्या बैठका होऊन त्यास दाद मिळू शकली नाही. त्यामुळे दोन वर्षांपासून रस्ते दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांचा प्रवास खडतर झाला आहे.
महामार्गांच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात गौण खनिज वाहताना अवजड वाहनांचा वापर करण्यात आला. रस्त्यांवर क्षमतेपेक्षा जास्त वजनाची वाहतूक झाल्याने मोठ मोठे खड्डे पडले आहेत. आंदोलने होऊनही दखल घेण्यात आली नाही.
क्षमतेपेक्षा दुप्पट वजनाची वाहतूक ग्रामीण रस्त्यांची वाहतूक क्षमता दहा टनापर्यंत आहे. तथापि, समृद्धी महामार्गासाठी २५ टन वजनापर्यंत डंपरद्वारे गौण खनिजाची वाहतूक सुरू आहे. त्यामुळे रस्त्यांनी केव्हाच श्वास सोडला आहे. एकीकडे प्रशस्त महामार्ग उभा राहत असताना दुसरीकडे ग्रामीण भागातील रस्ते वाहतुकीयोग्य राहिले नसल्याचे चित्र आहे. वाहनांना अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. दापूर येथे दोन महिन्यापूर्वी खड्ड्यांमुळे दुचाकीला अपघात घडून दोन जणांना जीव गमवावा लागला आहे.
एक किमी डांबरीकरणासाठी सरासरी ३५ लाख रुपये खर्च खंबाळे, सायाळे, मिठसागरे, मऱ्हळ, पांगरी, माळवाडी, भोकणी, निऱ्हाळे, सोनांबे, कोनांबे, डुबेरे, नांदूरशिंगोटे, शहा, आगासखिंड, दापूर, चापडगाव, गोंदे, मनेगाव, जयप्रकाशनगर, हरसुले, शिवडा, घोरवड, पांढुर्ली, पाथरे आदी गावांतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या १२ रस्त्यांचे ८६ किलोमीटरचे नुकसान झाले आहे. तर जिल्हा परिषदेच्या ३९ रस्त्यांच्या १९५ किलोमीटर अंतराचे नुकसान झाले आहे. याबाबतचा अहवाल कार्यकारी अभियंत्यांना वर्षभरापूर्वीच दिला आहे.
एक किमी डांबरीकरणासाठी सरासरी ३५ लाख रुपये खर्च येतो. तालुक्यातील २८२ किलोमीटर अंतराच्या रस्त्यांचे ९८ कोटी ७० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दिलीप बिल्डकाॅनकडे रस्ते पूर्ववत करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.