आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुक:‘कमको’च्या 17 जागांसाठी 52‎ अर्ज दाखल, छाननीत सर्व वैध‎

कळवण‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कळवण मर्चंट को-ऑप. बँकेसाठी‎ २९ जानेवारी रोजी मतदान होणार‎ आहे. छाननी होऊन एकूण ५२‎ नामनिर्देशन पत्र वैध ठरले आहेत.‎ दि. १८ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३‎ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्राच्या‎ माघारी नंतर खरे चित्र स्पष्ट होईल.‎ बँकेच्या गत निवडणुकीत १७‎ पैकी १३ जागा निवडून आणत सत्ता‎ ताब्यात घेण्यात तत्कालीन विरोधी‎ गटाचे नेते स्व. सुनील महाजन यांना‎ यश आले होते. तत्कालीन सत्ताधारी‎ गटाचे नेते स्व. सुनील शिरोरे, संजय‎ मालपुरे यांना केवळ चार जागेवर‎ यश आले होते.‎ सद्यस्थितीत सत्ताधारी गटातच‎ उभी फूट पडल्याने यावर्षी‎ निवडणूक चुरशीची होईल, असे‎ संकेत आहेत.

सत्ताधारी गटातील‎ प्रा. निंबा कोठावदे व योगेश मालपुरे‎ हे दोन्ही संचालक यांनी धनलक्ष्मी‎ पतसंस्थेचे संस्थापक दीपक महाजन‎ व सुभाष शिरोडे यांना सोबत घेत‎ विरोधी पॅनलच्या उमेदवारांची मोट‎ बांधत परिवर्तन पॅनलची निर्मिती‎ केली आहे. सत्ताधारी गटाने मात्र‎ गत निवडणुकीतील विरोधक संजय‎ मालपुरे व त्यांच्या कुटुंबातील‎ व्यक्तींना आपल्याकडे खेचत‎ गजानन सोनजे, योगेश महाजन,‎ प्रविण संचेती, नितीन वालखेडे‎ यांच्या नेतृत्वाखाली श्री समर्थ‎ पॅनलची निर्मिती करत‎ निवडणुकीचा निर्धार केला आहे.‎ नामनिर्देशन पत्र भरण्याचा शेवटच्या‎ दिवशी ५२ उमेदवारी अर्ज दाखल‎ झाले होते. छाननी होऊन सर्व अर्ज‎ वैध ठरले आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...