आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील सहकारी ग्राहक संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ५३ टक्के मतदानाची नाेंद झाली. बुधवारी (दि. १५) सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र शेळके यांनी दिली. सटाणा सहकारी ग्राहक संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी श्री परिवर्तन आणि यशवंत पॅनलमध्ये निवडणूक झाली. या निवडणुकीत १५ जागांसाठी ३४ उमेदवार रिंगणात होते. मंगळवारी (दि. १४) येथील लाडशाखीय वाणी मंगल कार्यालयात मतदान प्रक्रिया पार पडली.
सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेच्या दरम्यान मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सटाणा शहरासह चौगाव, मोरेनगर आराई, ब्राह्मणगाव, लोहाेणेर, ठेगोंडा, मुंजवाड, विरगाव, खमताणे, तिळवण, दऱ्हाणे, आखतवाडे, मुंजवाड, पिंपळदर, निकवेल, कौतिकपाडे, औंदाणे, खालप, मेशी, खुंटेवाडी आदी गावांसह बागलाण व देवळा तालुक्यातील ७५८८ पैकी ४०१७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान प्रकिया शांततेत पार पडली. सटाणा पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक किरण पाटील, सहायक निरीक्षक वर्षा जाधव यांनी बंदोबस्त ठेवला होता. मतमोजणीसाठी १० टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक पॅनलचे उमेदवार किंवा प्रतिनिधी अशा २० जणांना मतमोजणीच्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे. मोबाइल कुणालाही जवळ बाळगता येणार नाही. मतमोजणीच्या दोन फेऱ्या होतील. प्रत्येक फेरीत उमेदवाराला मिळालेली मते जाहीर करण्यात येतील, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शेळके यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.